उत्पत्ती 36

36
एसावाचे वंशज
(१ इति. 1:34-37)
1एसाव म्हणजे अदोम ह्याची वंशावळ :
2एसावाने कनानी मुलींतून बायका केल्या. एलोन हित्ती ह्याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा,
3आणि इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण बासमाथ ह्या बायका त्याने केल्या.
4एसावापासून आदेला अलीपाज व बासमाथेला रगुवेल हे मुलगे झाले;
5आणि अहलीबामेस यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले, 6मग एसाव आपल्या बायका, मुलगे, मुली, आपल्या घरची सर्व माणसे, आपली गुरेढोरे व इतर जनावरे, आणि कनान देशात मिळवलेले धन हे सर्व घेऊन याकोब राहत होता तेथून दूर देशी निघून गेला.
7कारण त्याची संपत्ती एवढी वाढली की, त्यांना एकत्र राहण्याची सोयच नव्हती; तसेच त्यांची गुरेढोरे फार वाढल्या-मुळे ज्या देशात ते उपरे होते तेथे तेवढ्यांचा निर्वाह होईना.
8म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम.
9सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव ह्याची वंशावळ : 10एसावाच्या मुलांची नावे ही : एसावाची बायको आदा हिचा मुलगा अलीपाज आणि एसावाची बायको बासमाथ हिचा मुलगा रगुवेल.
11अलीपाज ह्याचे मुलगे तेमान, ओमार, सपो, गाताम आणि कनाज हे होते.
12एसावाचा मुलगा अलीपाज ह्याची तिम्ना म्हणून एक उपपत्नी होती, तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा हिचा हा वंश.
13रगुवेलाचे मुलगे नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा हे होते; एसावाची बायको बासमाथ हिचा हा वंश.
14सिबोनाची मुलगी1 अना, ह्याची कन्या अहलीबामा जी एसावाची बायको तिच्यापासून एसावाला यऊश, यालाम व कोरह हे मुलगे झाले.
15एसाव वंशांतले सरदार झाले ते हे : एसावाचा पहिला मुलगा अलीपाज; ह्याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज,
16सरदार कोरह, सरदार गाताम व सरदार अमालेक; अदोम देशात अलीपाज ह्याच्या पोटी हे सरदार झाले. हे आदेचे मुलगे.
17एसावाचा मुलगा रगुवेल ह्याचे मुलगे हे : सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शाम्मा व सरदार मिज्जा, हे सरदार रगुवेलास अदोम देशात झाले; एसावाची बायको बासमाथ हिचे हे मुलगे.
18एसावाची बायको अहलीबामा, हिचे मुलगे हे : सरदार यऊश, सरदार यालाम व सरदार कोरह; हे सरदार एसावाची बायको अहलीबामा, अनाची मुलगी, हिला झाले.
19एसाव म्हणजे अदोम ह्याचा हा वंश, व हे त्यांचे सरदार.
सेईराचे वंशज
(१ इति. 1:38-42)
20सेईर होरी ह्याचे जे मुलगे त्या देशात राहत होते ते हे : लोटान, शोबाल, सिबोन व अना,
21दिशोन, एसर व दीशान; हे अदोम देशात सेईराचे होरी वंशातील सरदार होत.
22लोटानाचे मुलगे होरी व हेमाम हे होत; लोटानाची बहीण तिम्ना ही होती.
23शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम हे होते.
24सिबोनाचे मुलगे अय्या व अना हे होते. आपला बाप सिबोन ह्याची गाढवे राखत असता ज्याला रानात उष्ण पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.
25अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
26दिशोनाचे मुलगे हेमदान, एश्बान, यित्रान व करान हे होत.
27एसराचे मुलगे बिल्हान, जावान व अकान हे होत.
28दिशानाचे मुलगे ऊस व अरान हे होत.
29होर्‍यांपैकी जे सरदार झाले ते हे : सरदार लोटान, सरदार शोबाल, सरदार सिबोन, सरदार अना,
30सरदार दिशोन, सरदार एसर, सरदार दीशान; सेईर देशातील होर्‍यांचे सरदार हे होत.
अदोम देशाचे राजे
(१ इति. 1:43-54)
31इस्राएल लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे :
32बौराचा मुलगा बेला ह्याने अदोमात राज्य केले; त्याची राजधानी दिन्हाबा नगर होते.
33बेला मेल्यावर बस्रा येथला जेरहाचा मुलगा योबाब त्याच्या जागी राजा झाला.
34योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हूशाम त्याच्या जागी राजा झाला.
35हूशाम मेल्यावर बदाद ह्याचा मुलगा हदाद त्याच्या जागी राजा झाला; ह्यानेच मवाबाच्या मैदानात मिद्यान्यांचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते.
36हदाद मेल्यावर मास्रेका येथील साम्ला त्याच्या जागी राजा झाला.
37साम्ला मेल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथला शौल त्याच्या जागी राजा झाला.
38शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान त्याच्या जागी राजा झाला.
39अकबोराचा मुलगा बाल-हानान हा मेल्यावर हदार त्याच्या जागी राजा झाला; त्याची राजधानी पाऊ होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.
40एसाव वंशांतील सरदारांची नावे, कुळे व राहण्याच्या ठिकाणांवरून असलेली नावे ही : सरदार तिम्ना, सरदार आल्वा, सरदार यतेथ,
41सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पीनोन,
42सरदार कनाज, सरदार तेमान, सरदार मिब्सार,
43सरदार माग्दीएल व सरदार ईराम; अदोम वंशजांनी जो देश वतन करून घेतला, त्यातल्या त्यांच्या निवासस्थानांप्रमाणे त्यांचे हे सरदार होत. अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव.

Marker

Del

Kopier

None

Vil du ha høydepunktene lagret på alle enhetene dine? Registrer deg eller logg på

Video om उत्पत्ती 36