लुका 19
19
जक्कयच्या घरी येशू
1अन् येशू यरीहो शहरात गेला अन् तो शहरात चालून रायला होता. 2अन् तती जक्कय नावाचा एक माणूस होता, जो जकातदारायचा प्रमुख होता अन् लय धनवान होता. 3अन् तो येशूले पाह्याचा प्रयत्न करत होता, कि तो कसा हाय? पण गर्दीच्या कारणाने पाऊ शकत नव्हता, कावून कि तो ठेंगणा होता. 4तवा येशूले पायण्यासाठी तो समोर धावून एका उंबराच्या झाडावर चढला, कावून कि येशू त्याचं रस्त्यान जाणार होता. 5जवा येशू त्या झाडा जवळ पोहचला, तवा वरते पायलं अन् त्याले म्हतलं, “हे जक्कय लवकर खाली उतर, कावून कि आज मले तुह्यावाल्या घरी रायने नक्की हाय.” 6मंग तो पटकन खाली उतरून आनंदाने येशूने स्वागत केले. 7हे पाऊन सगळे लोकं कुर-कुर करून म्हणू लागले, “तो तर एका पापी माणसाच्या घरी गेला हाय.” 8जक्कयान जेवणाच्या वाक्ती उभे राऊन प्रभू येशूले म्हतलं, “हे प्रभू, पाहा, मी माह्यावाली अर्धी संपत्ती गरिबांना देतो, अन् जर कोणाचं पण अन्यायानं कर घ्याच्या वाक्ती घेतलं अशीन, तर चौपट वापस देतो.” 9तवा येशूनं त्याले म्हतलं, “आज ह्या घरातल्या लोकायच्या मधात तारण आलं हाय, कावून कि हा पण अब्राहामाचा खरा पोरगा हाय. 10कावून कि, मी माणसाचा पोरगा, अनंत दंडापासून वाचव्याले, अन् त्याचं तारण करण्यासाठी आलो हाय.”
दहा मोहरे
(मत्तय 25:14-30)
11जवा लोकं ह्या गोष्टी आयकून रायले होते, तवा त्यानं त्यायले एक कथा सांगतली, कावून कि तो यरुशलेम शहराच्या जवळ होता, अन् त्यायले असं वाटत होतं कि देवाचं राज्य आताच प्रगट होणार हाय. 12मंग त्यानं म्हतलं, एक धनवान माणूस दूरच्या देशात गेला, ह्या साठी कि राजासन मिळून परत यावं. 13तवा त्यानं आपल्या नौकरातून, दहा नौकरायले बलावून त्यायले दहा मोहरे देली, (म्हणजे त्याची किंमत दहा दिवसाची मजुरी होती) अन् त्यायले म्हतलं मी येई परेंत यावर घेणं-देनं करजा. 14“पण त्याच्या नगरातले लोकं त्याचा राग करत होते, अन् त्याच्यावाल्या मांग काई संदेश वाहकायले हे सांगासाठी पाठवले, कि आमची इच्छा नाई कि हा आमचा राजा बनावा.”
15जवा तो राजासन मिळून वापस आला, तवा असं झालं, कि त्यानं आपल्या दासायले ज्यायले त्यानं पैसा देला होता, त्यायले आपल्यापासी बलावलं ह्या साठी कि मालूम व्हावं कि त्यायनं घेणं-देनं करून काय-काय कमावलं हाय. 16तवा पयल्यान येऊन म्हतलं, हे स्वामी तुह्यावाल्या पासून जे दहा मोहरे (एक मोहर म्हणजे एका दिवसाची मजुरी) घेतले होते त्याच्यापासून मी अजून दहा मोहरे (म्हणजे दहा दिवसाची मजुरी) कमावले हायत. 17तवा घरधन्यान त्याले म्हतलं, धन्य हायस तू चांगल्या अन् विश्वासयोग्य दासा तू थोडसाक मध्ये विश्वासयोग्य रायला, म्हणून तू आता दहा नगराचा अधिकारी हो. 18मंग दुसऱ्या दासानं येऊन म्हतलं, हे स्वामी, तुह्या पाच मोहर पासून मी अजून पाच मोहर कमावले हाय. (पाच मोहरे म्हणजे पाच दिवसाची मजुरी) 19त्याच्यावाल्या घरधन्यान त्याले म्हतलं, तू पण पाच नगरावर अधिकारी हो. 20मंग तिसऱ्यानं येऊन म्हतलं, “हे स्वामी, पाहा, तुह्यावाल्या देलेल्या एक-एक मोहर हे हाय, ज्याले मी माह्याल्या रुमालात बांधून ठेवली होती. 21कावून कि मी तुले भेत होतो, कारण तू कठोर माणूस हायस, जे तू ठेवलं नाई ते उचलून घेतो, अन् जे तू पेरलं नाई त्याची कटाई करतो. 22तवा त्याच्या घरधन्यान त्याले उत्तर देलं, हे दुष्ट दास मी तुह्यावाल्या तोंडानं तुले दोषी ठरवतो, तू मले ओयखलं होतं कि मी कठोर माणूस हाय, जे मी नाई ठेवलं, ते उचलून घेतो, अन् जती मी पेरले नाई तती कापतो; 23तर तू माह्याले पैसे व्यापाऱ्याकडे कावून नाई ठेवले, कि मंग मी आल्यावर व्याजा सगट वापस घेतले असते?” 24अन् जे लोकं जवळ उभे होते, तवा त्यानं त्यायले म्हतलं, ते मोहर त्याच्यावाल्या पासून घेऊन घ्या, अन् ज्याच्यापासी दहा मोहरे हायत त्याले घ्या. 25तवा त्यायनं त्याले म्हतलं, हे स्वामी, त्याच्यापासी दहा मोहरे तर हायत. 26मी तुमाले सांगतो, “अशाचं प्रकारे, ज्याच्यापासी देवाच्या वचनाच ज्ञान हाय, त्याले अजून दिल्या जाईन अन् ज्याच्यापासी नाई हाय, जे काई त्याच्यापासी अशीन ते पण त्याच्यापासून वापस घेतल्या जाईन. 27पण माह्याल्या त्या विरोध्यायले ज्यायले वाटत जाय कि मी त्यायचा राजा नाई बनावं, त्या विरोध्यायले अती माह्याला समोर आणून मारून टाका.”
यरुशलेम शहरात विजय प्रवेश
(मत्तय 21:1-11; मार्क 11:1-11; योहान 12:12-19)
28ह्या गोष्टी सांगतल्यावर येशू यरुशलेम शहराकडे आपल्या शिष्याय संग समोर-समोर चालला होता. 29अन् जवा तो जैतून नावाच्या पहाडाच्या जवळून बैथफगे गाव अन् बेथानी गावाच्या जवळ आला, तवा त्यानं आपल्या शिष्यातून दोघायले हे म्हणून पाठवलं. 30“समोरच्या गावात जा, अन् तती गेल्यावर तुमाले एक गध्याचं पिल्लू दिसीन, ज्यावर आतापरेंत कोणी कधी बसलेलं नाई, बांधलेलं दिसीन, ते सोडून आणा. 31अन् जर कोणी तुमाले विचारीन कि कावून खोलता, तवा हे सांगजा आमच्या प्रभूले याची गरज हाय.”
32ज्यायले पाठवलं होतं, त्यायनं जाऊन जसं त्यायले सांगतल होतं, तसचं पायलं. 33अन् जवा ते गध्याचं पिल्लू दिसलं तवा ते त्याले सोडून रायले होते, तवा त्या गध्याच्या मालकाने त्यायले विचारलं, “हे गध्याचं पिल्लू तुमी कावून सोडता?” 34तवा त्यायनं म्हतलं, प्रभूले याची गरज हाय. 35मंग त्यायनं ते गध्याचं पिल्लू येशू पासी आणलं, त्याच्यावर आपले कपडे टाकून, येशूले त्याच्यावर बसवलं. 36जवा ते जाऊन रायले होते, तवा बरेचं लोकं येशूच्या समोर त्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर आप-आपले कपडे टाकत होते. 37अन् जवा तो यरुशलेम शहरा जवळ जैतून पहाडाच्या उतारावर पोहचला, तवा शिष्यायचा सारा समुदाय त्या सगळ्या चमत्काराचे कामाचा बद्दल जे त्यायनं पायले होते, आनंदित होऊन मोठ्या आवाजाने देवाची स्तुती करू लागले. 38कि “धन्य हाय तो राजा, जो प्रभूच्या नावानं येतो, स्वर्गात शांती अन् अभायात गौरव हो.”
39तवा गर्दीतल्या कईक परुशी लोकायन त्याले म्हतलं, “हे गुरु आपल्या शिष्यांना दाट कि त्यायनं चूप राहावं.” 40तवा येशूनं उत्तर देलं, “मी तुमाले सांगतो कि, जर हे लोकं चूप रायले तर गोटे माह्याला गौरव करण्यासाठी ओरडनं सुरु करतीन.”
यरुशलेम शहरासाठी दुख
41जवा येशू यरुशलेम शहराच्या जवळ आला, तवा तो त्या नगराले पाऊन रडू लागला. 42“निदान आज तुले शांतीचा रस्ता मिळाला असता; पण आता खूप वेळ झाली हाय, अन् शांती तुह्या पासून लपली हाय. 43कावून कि असे दिवस तुह्यावर येतीन, कि तुह्याले शत्रू तुह्यावाल्या भोवती लाकडी कोट बांधून तुले घेरून घेतीन, अन् तुले चवभवंताल बांधून टाकतीन. 44अन् तुह्ये शत्रू तुले पूर्ण पणे नष्ट करून टाकतीन, अन् तुह्या लेकरायले मारून टाकतीन, अन् तुह्या नगरातल्या सर्व्या लोकायले मातीत मिसळवून टाकतीन, कावून कि तू त्यावाक्ती जवा देव तुले वाचव्याले आला होता ओयखलं नाई.”
देवळाची सफाई
(मत्तय 21:12-17; मार्क 11:15-19; योहान 2:13-22)
45तवा तो देवळात गेला अन् जे विक्री करत होते त्यायले तो बायर हकालु लागला. 46अन् येशूनं त्यायले म्हतलं, “पवित्रशास्त्रात असं लिवलेल हाय, कि लोकं माह्या घराले प्रार्थनाचे घर म्हणतीन, पण त्या देवळाले तुमी लुटारूची गुफा बनून टाकली हाय.” 47अन् येशू दररोज देवळात उपदेश करत होता, अन् मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् लोकायचे प्रमुख त्याले माऱ्याच्या बद्दल मौका पायत होते. 48पण कोणताच उपाय नाई काढू शकले, कि हे कसं करावं; कावून कि सगळे लोकं मोठ्या हर्ष उल्लासाने त्याचं आयकतं होते.
Terpilih Sekarang Ini:
लुका 19: VAHNT
Highlight
Kongsi
Salin
Ingin menyimpan sorotan merentas semua peranti anda? Mendaftar atau log masuk
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.