लुका 18

18
विधवा बाई अन् अधर्मी न्यायाधीश
1आणखी येशूनं आपल्या शिष्यायले कि सर्वदा प्रार्थना केली पायजे, अन् हिम्मत नाई सोडली पायजे, ह्या साठी त्यानं त्यायले कथेच्या व्दारे समजावलं. 2“कोण्या एका नगरात एक न्यायाधीश रायत होता, जो ना देवाले भेत होता, अन् नाई कोण्या माणसाची परवा करत होता. 3अन् त्याचं नगरात एक विधवा पण रायत होती, तवा जे त्याच्यापासी घडी-घडी जाऊन विनंती करत होते, कि माह्याला न्याय करून मले शत्रू पासून वाचव. 4तो कईक दिवसापरेंत तर मानलाचं नाई, पण आखरीले मनात विचार करून म्हतलं, जरी मी देवाले भेत नाई, अन् कोण्या माणसाची परवा करत नाई; 5तरी पण हे विधवा मले तरास देत रायत हाय, म्हणून मी तिचा न्याय करूनच टाकतो, नाई तर असं नाई व्हावं कि ते पुन्हा-पुन्हा येऊन आखरीले माह्याल्या नाकात दम करून टाकीन.”
6तवा प्रभू येशूनं म्हतलं, “विचार करा कि त्या अधर्मी न्यायाधीशाने काय म्हतलं? 7देव आपल्या निवडलेल्या लोकायसाठी जे रातदिवसा त्याचा समोर रडतात त्यायचा न्याय करीन, तो त्यायची मदत कऱ्याले वेळ नाई करीन. 8मी तुमाले सांगतो, तो लवकरच त्यायचा न्याय करून टाकीन, मी, माणसाचा पोरगा जवा येईन, तवा मले आश्चर्य होईन कि पृथ्वीवर किती लोकं भेटतीन जे माह्यावर विश्वास करत असणार.”
कोणाले धर्मी केले जाईन?
9त्यानं त्या लोकायले जे आपल्या स्व:ता वर भरोसा ठेवत होते, कि ते धर्मी हाय, अन् दुसऱ्यांना तुच्छ मानत होते, त्याच्यासाठी ही कथा सांगतली: 10कि “दोन माणसं देवळात प्रार्थना कऱ्यासाठी गेले, त्याच्यात एक परुशी होता, अन् दुसरा जकातदार होता.” 11“परुशी उभा राऊन आपल्या मनात हे प्रार्थना करू लागला, कि हे देवा, मी तुह्याला धन्यवाद करतो, कि मी दुसऱ्या माणसा सारखा क्रूरता करणारा अन्यायी अन् व्यभिचारी नाई अन् नाई या जकातदारा सारखा हावो. 12मी हप्त्यातून दोन खेप उपास करतो, अन् मी आपल्या कमाईचा दहावा भाग पण तुमाले देतो.”
13“पण जकातदार दूरचं उभा राऊन, स्वर्गाच्या इकडे डोये लावायचा सुद्धा विचार नाई केला, पण दुखात आपली छाती पिटून-पिटून म्हणू लागला, हे देवा मी पापी हाय माह्यावर दया कर, अन् मले क्षमा कर. 14मी तुमाले सांगतो, कि तो परुशी नाई, पण हाचं जकातदार माणूस धर्मी होऊन आपल्या घरी गेला, कावून कि जो कोणी स्व:ताले मोठा समजीन, तो लायना केला जाईन, अन् जो आपल्या स्व:ताला लायना समजीन, तोच मोठा केला जाईन.”
देवाचे राज्य लहान लेकराय सारखे
(मत्तय 19:13-15; मार्क 10:13-16)
15मंग काई लोकायन आपल्या लेकरायले येशू पासी आणलं, कि त्यानं त्यायच्यावर हात ठेवून आशीर्वाद देला पायजे, पण त्याच्या शिष्यायनं आणनाऱ्यायले दटावलं. 16तवा येशूनं लेकरांना आपल्यापासी बलावून म्हतलं, “लेकरायले माह्यापासी येऊ घ्या त्यायले म्हणा करू नका, कावून कि देवाचं राज्य यायच्याचं सारख्यायचं हाय. 17मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जो कोणी देवाच्या राज्याले लेकरा सारखं बनून स्वीकार करत नाई, तोपरेंत त्यात कधी प्रवेश करणार नाई.”
एका धनवान माणसाचा येशूला प्रश्न
(मत्तय 19:16-30; मार्क 10:17-31)
18तवा कोण्या एका अधिकाऱ्यान त्याले विचारलं, कि “काहो उत्तम गुरुजी, अनंत जीवन भेट्याले मी काय करू?” 19येशूनं त्याले म्हतलं, “तू मले उत्तम कावून म्हणत? कोणी उत्तम नाई, पण फक्त देवचं उत्तम हाय. 20तुले तर देवाच्या आज्ञा तर मालूम हाय, कि व्यभिचार करू नोको, खून करू नोको, चोरी करू नोको, खोटा पुरावा देऊ नोको, अन् आपला माय-बापाचा मानदान ठेव.” 21-22तवा त्यानं येशूले म्हतलं, “गुरुजी ह्या सगळ्या आज्ञा मी लहान पणापासून मानत आलो हाय.” हे आयकून येशूनं त्याले म्हतलं, “तुह्यात अजून एका गोष्टीची कमी हाय, जाय जे काई संपत्ती तुह्या जवळ हाय ते इकून टाक; अन् गरीबायले दान कर, तवा तुले स्वर्गात लय धन भेटनार. अन् माह्य अनुकरण कर माह्यवाला शिष्य बन.” 23तो ह्या गोष्टी आयकून खुपचं नाराज झाला, कावून कि तो लय धनवान होता.
24तवा येशूनं त्याले ध्यान देऊन पायलं कि तो किती उदास हाय, अन् म्हतलं, “देवाच्या राज्यात धनवानायले जाणं लय अवघड हाय! 25एका उंटाले सुईच्या शेद्रातुन जाणं कठीण हाय, पण एका धनवानाले देवाच्या राज्यात जाणं त्याच्याऊनही लय कठीण हाय.” 26जे हे आयकून रायले होते त्यायनं म्हतलं, “मंग कोणाचे चांगलं होणं शक्य हाय?” 27त्यानं म्हतलं, “माणसायले तर हे अवघड हाय पण देवाले सगळं काही शक्य हाय.” 28पतरसन येशूले म्हतलं, “पाहा, आमी घरदार सोडून तुह्यावाल्या मांग आलो हाय.” 29-30येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो, असा कोणी नाई ज्यानं देवाच्या राज्यासाठी घरदार, बायको, बहीण-भाऊ, माय-बाप, लेकरं-बाकरं सोडलं अशीन. अन् या काळात कईक गुणा अधिक नाई भेटन, पण स्वर्गात अनंत जीवन मिळणार.”
पुनरुत्थानाची भविष्यवाणी
(मत्तय 20:17-19; मार्क 10:32-34)
31तवा येशूनं त्या बारा जनायले जवळ घेऊन त्यायले म्हतलं, “पाहा, आपण यरुशलेम शहरात जात आहोत, अन् जेवड्या गोष्टी माणसाच्या पोराच्या बद्दल भविष्यवक्त्याच्या व्दारा पवित्रशास्त्रात लिवल्या गेल्या हायत त्या सर्व्या पुऱ्या होतीन. 32कावून कि तो परक्या लोकायच्या हातात देल्या जाईन, अन् ते त्याची मजाक करतीन, अन् त्याच्या अपमान करतीन, अन् त्याच्यावर थुकतीन. 33अन् त्याले कोडे मारतीन, अन् त्याचा जीव घेऊन टाकतीन अन् तो तिसऱ्या दिवशी परत जिवंत होईन.” 34अन् त्यायले ह्या गोष्टीतून कोणतीच गोष्ट समजली नाई, अन् ह्या गोष्टी त्यायच्यात गुप्त रायली, अन् जे सांगतल्या गेलं ते त्यायच्या लक्षात आलं नाई.
फुटक्या भिखाऱ्याला दुष्टीदान
(मत्तय 20:29-34; मार्क 10:46-52)
35जवा येशू यरीहो शहराच्या जवळ पोहचला, तवा एक फुटका माणूस सडकीच्या बाजूनं बसून भीख मांगून रायला होता. 36अन् तो त्या गर्दीचा आवाज आयकून विचारू लागला, “हे काय होऊन रायलं हाय?” 37त्यायनं त्याले सांगतल, “नासरत नगराचा येशू येथून जात हाय.” 38तवा त्यानं मोठ्या आवाजाने म्हतलं, “हे येशू दाविद राजाच्या पोरा माह्यावर दया कर!” 39जे समोर जात होते, ते त्याले दटावलं होते कि चूप राहा, पण तो अजूनच जोऱ्यानं कल्ला करू लागला, “हे दाविद राजाच्या पोरा माह्यावर दया कर!” 40-41तवा येशू तती थांबला, अन् त्यायले आज्ञा देली, त्याले माह्यापासी आना, अन् लोकायन त्या फुटक्याले आणलं तवा येशूनं त्या फुटक्याले विचारलं, “तुले काय वाटते कि मी तुह्यासाठी काय करू?” फुटक्यानं म्हतलं, “गुरुजी हे कि मी डोयान पायलं पायजे.” 42-43तवा येशूनं त्याले म्हतलं, “पाहू लाग, तुह्या विश्वासानं तुले वाचवलं हाय,” अन् त्याले पटकन दिसू लागलं, अन् तो देवाचा गौरव करत त्याच्या मांग चालू लागला, अन् सर्व्या लोकायन हे पाऊन देवाच गौरव केलं.

Terpilih Sekarang Ini:

लुका 18: VAHNT

Highlight

Kongsi

Salin

None

Ingin menyimpan sorotan merentas semua peranti anda? Mendaftar atau log masuk