लुका 12
12
मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् परुशी सारखे नका बना
1इतक्यात हजारो लोकायची भीड़ लागली, एवढी कि ते एकादुसऱ्यावर पडू रायले होते, तवा तो सऱ्यात पयले आपल्या शिष्यायले म्हणू लागला, “परुशी लोकायचे कपटरुपी खमिरापासून सावधान रहा. 2जे काई झाकलेल नाई, हाय ते दिसून येईन, अन् सगळं लपवलेली गोष्ट दाखवल्या जाईन जे कळणार नाई. 3म्हणून जे काई तुमाले अंधारात सांगतल ते तुमी लोकायले ऊजीळात सांगा अन् जे मी तुमाले कानात गुप्तपणे सांगतो ते घराच्या धाब्यावरून सर्व्या लोकायले प्रचार केला जाईन.”
देवालेच भ्या
(मत्तय 10:28-31)
4“पण मी तुमाले जे माह्याले मित्र हायत म्हणतो, त्या लोकायले भेऊ नका जे फक्त शरीराले घात करू शकते, पण त्याच्याशिवाय काई करू नाई शकत, त्यायले भेऊ नका. 5पण तुमी कोणाले भ्यावे हे मी तुमाले सुचवतो, जीवानं मारल्यानंतर नरकात टाक्याचा अधिकार ज्याच्यापासी हाय, त्याले भ्या, म्हणून मी तुमाले सांगतो त्याले भ्या. 6काय दोन पैशाच्या पाच चिमण्या इकल्या जाते, तरी पण देवबाप त्याच्यातून एकाले पण विसरत नाई. 7तुमच्या डोक्यावर किती केसं हायत हे पण देवाले माहीत हाय. म्हणून भेऊ नका, कावून कि तुमी देवासाठी चिमण्याहून जास्त मूल्यवान हायत.”
येशूले नकाराचा अर्थ
(मत्तय 10:32-33; 12:32; 10:19-20)
8“पण मी तुमाले सांगतो, जो कोणी मले माणसा समोर ग्रहण करीन, माणसाचा पोरगा पण देवबाप अन् देवदूताय समोर त्याले ग्रहण करीन. 9पण जो कोणी माणसा समोर, माह्याला नाकार करीन, त्याले मी पण आपल्या देवबापाच्या देवदूतायच्या समोर नाकार करीन. 10जो कोणी माणसाच्या पोराच्या विरोधात कोणती गोष्ट मनीनं, त्याचे ते अपराध माप केले जातीन, पण जो कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्धात निंदा करीन त्याचे पाप देव कधीच क्षमा करणार नाई. 11-12अन् जवा लोकं तुमाले धार्मिक सभास्थानात, सरकार, व अधिकाऱ्याच्या हाती सोपून देतीन, तवा काळजी करू नका, कि आमी काय बोलू, अन् आमी कसं काय उत्तर देऊ? कावून कि पवित्र आत्मा त्याचं वेळी तुमाले शिकवण कि काय बोलाचं हाय.”
एका धनवान माणसाची कथा
13तवा समुदायातून कोणत्या एका माणसानं येशूले म्हतलं, “हे गुरुजी मले माह्याल्या बापाच्या संपत्तीतून वाटा मिळावं म्हणून माह्याल्या भावाले सांग.” 14तवा येशूनं त्याले म्हतलं, “हे दोस्ता, कोण मले तुमचा न्याय कराले किंवा संपत्ती वाटायले ठेवलं हाय?” 15अन् त्यानं त्याले म्हतलं, “सावध राहा, अन् सगळ्या प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कावून कि कोणाच्या पासी कितीही संपत्ती असो पण त्या लय संपत्तीत त्याचे जीवन नाई हाय.” 16तवा येशूनं त्यायले एक कथा सांगतली, “कोण्या एका धनवान माणसाच्या जमिनीत लय पीकं आले. 17तवा तो आपल्या मनात विचार करून रायला होता, मले नाई समजून रायलं कि काय करू, कावून कि माह्याल्या जवळ एवढी जागा नाई, जती आपलं पीकं ठेवू. 18मंग त्यानं म्हतलं, मले मालूम हाय मले काय करायचं हाय, असं करतो कि आपले गोदाम मोडून त्याच्याहून मोठं गोदाम बांधतो, अन् तती आपलं सर्व गहू धान्य अन् मालमत्ता ठेवीन. 19अन् आपल्या जीवाले मनीनं, हे जिवा, तुह्यापासी लय वर्षासाठी बऱ्याचं माल ठेवला हाय, तू आराम कर, अन् खाऊन पिऊन सुखानं राय. 20पण देवानं त्याले म्हतलं, अरे मुर्खा, याचं राती जर तू मेला, तर हे धन जे तू एकत्र केलं हाय याचं काय होईन? 21असचं त्या माणसा सोबत होईन जो सगळं काई आपल्यासाठी जमा करते, पण देवाची सेवा करायसाठी आपल्या क्षमतेचा अन् धनाचा उपयोग नाई करत.”
कोणत्याचं गोष्टीची चिंता नका करू
(मत्तय 6:25-34; 6:19-21)
22अजून येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, “म्हणून मी तुमाले सांगतो, कि आपल्या जीवाची चिंता नका करू, कि आमी काय खावं अन् आपल्या शरीरा बद्दल कि आमी काय नेसावं. 23कावून कि अन्नापेक्षां जीव, अन् कपड्या पेक्षा शरीर मोठं नाई हाय. 24कावळ्यायवर ध्यान ठेवा, नाई ते जमिनीत पेरतात, अन् नाई कापतात, अन् त्यायचे गोदाम पण नाईत, तरी पण देवबाप त्यायचं पालन पोषण करते. तुमी पाखरांपेक्षा किती तरी मोलाचे हा. 25तुमच्याईत कोण हाय, जो चिंता करून आपलं आयुष्य वाढवू शकतो? 26म्हणून, जर तुमच्याच्यानं लायण्यात लहान काम पण होतं नशीन, तर दुसऱ्या गोष्टीच्या चिंतेत नका राहू. 27सोसनाच्या फुलावर ध्यान करा, कि ते कसे वाढतात, ते नाई मेहनत करतात अन् नाई कापते. तरी पण मी सांगतो, सुलैमान पण आपल्या सर्व्या वैभवात त्यायच्यातून कोणाच्याही सारखे कपडे घातलेला नव्हता. 28म्हणून जर देव मैदानाच्या गवताले जे आज हाय अन् उद्या आगीच्या भट्टीत टाकली जाईन, असा घालून देते, तर हे अल्पविश्वासायनो, तो तुमाले त्याच्यावून चांगलं कावून नाई घालून देईन. 29अन् तुमी याच्या शोधत नका राहा कि आपण काय खावावं, अन् काय पीवावं, अन् शंका पण करू नका. 30कावून कि जगातील अन्यजाती लोकं ह्या सऱ्या गोष्टीच्या शोधात रायतात, पण तुमचा देवबापाले माहीत हाय कि तुमाले ह्या गोष्टीची गरज हाय. 31पण तुमी देवाच्या राज्याच्या शोधात राहा, तवा ह्या गोष्टी पण तुमाले मिळून जातीन.”
धनाले कुठं जमा कराच?
32“तुमी मेंढराच्या कळपा सारखे हा, भेऊ नका, कावून कि तुमच्या देवबापाले वाटते कि तुमाले राज्य द्यावं 33जे तुमची संपत्ती हाय ते विकून दान करा, अन् आपल्यासाठी अशा पिशव्या बनवा, कि ते कधीच जुनी नाई होतं, अर्था स्वर्गात असं धन एकत्र करा, जे घटत नाई, अन् तती चोर जात नाई, अन् कीडा पण खराब करत नाई. 34कावून कि जती तुह्यालं धन हाय, ततीसाक तुह्यालं मन पण लागून राईन.”
नेहमी तयार राहा
(मत्तय 24:42-44)
35“तुमची कमर बांधून अन् दिवे जाळून काम कऱ्यासाठी तयार राहा. (माह्या परत आगमनासाठी तयार राहा) 36अन् तुमी त्या माणसायं सारखे बना, जे आपल्या मालकाची वाट पाऊ रायले, कि त्यायच्या मालक लग्नातून कधी वापस येईन, जवा तो येऊन दरवाजा वाजवीन, तवा ते लवकर येऊन त्याच्यासाठी खोलतिन. 37धन्य हायत ते दास, ज्यायले त्याचा मालक येऊन, त्याची वापस याची वाट पायतानं दिसते. मी तुमाले खरं-खरं सांगतो, तो मालक एका सेवका सारखा कपडे घालून त्यायले जेव्याले बसविण, अन् जवळ येऊन त्यायची सेवा करीन. 38धन्य हायत ते सेवक, ज्यायले मालक अर्ध्याराती किंवा मोठ्या सकाळी येऊन त्याच्या सेवकायले जागे पाईन. 39पण लक्षात ठेवा कि घरच्या मालकाले मालूम असते कि चोर कोणत्या वाक्ती येईन, तर तो जागत रायला असता, अन् आपल्या घरात चोरी होऊ देली नसती. 40म्हणून तुमी पण माह्या वापस येण्याच्या वेळी तयार राहा, कावून कि ज्या वेळी तुमी विचार पण नाई करसान, त्याचं वेळी माणसाचा पोरगा स्वर्गातून येवून जाईन.”
विश्वासयोग्य दास कोण?
(मत्तय 24:45-51)
41तवा पतरसन विचारलं, “हे प्रभू, काय तू हि कथा आमच्यासाठी सांगून रायला हाय कि सगळ्यायसाठी?” 42तवा प्रभू येशूनं म्हतलं, “तुमच्यात विश्वासयोग्य अन् बुद्धीमान खजिनदार कोण हाय, ज्याचा मालक त्याले नौकर चाकरावर सरदार ठेवते कि त्यायले नेमलेल्या वेळेवर जेवण द्यावं. 43धन्य हाय, तो दास ज्याचा मालक असचं येवून त्याले करतांना पायते. 44मी तुमाले खरं सांगतो, तो त्याले आपल्या साऱ्या धनावर वर अधिकारी ठेवीन. 45पण जर माह्याल्या दास विचार करीन, कि माह्याल्या घरधनी येण्यात उशीर करून रायला, तवा तो दुसऱ्या दास दासियालें मारते, पीटते अन् खाऊन पिऊन पेण्यारा हून रायला अशीन. 46तर त्या दासाचा मालक अशा दिवशी येईन, त्यावाक्ती तो त्याची वाट पण पायतं नशीन, अन् त्यावाक्ती तो स्वामी त्याले लय भारी सजा देईन, त्याच्या भाग कपटी लोकाय संग ठरविन 47अन् जो दास ज्यानं आपल्या घरधन्याची इच्छा काय हाय हे जाणून, पण तयारी केली नशीन, अन् त्याचा इच्छाचा अनुसार नाई चलत अशीन तर तो लय मार खाईन. 48पण ज्यानं माहीत नसतांना मार खायाचं काम केलं, तो थोडाच मार खाणार. ज्याले लय देले हाय, त्याच्यापासून लय मांगतलं जाईन अन् ज्याले लय सोपून देलं हाय त्याच्यापासून आणखी घेतलं जाईन.”
शान्ति नाई फुट
(मत्तय 10:34-36)
49“मी पृथ्वीवर आग लाव्याले आलो हाय, अन् मले असं वाटते कि हे आताच पेटली पायजे. 50माह्या समोर एक मोठ्या दुखाचा बाप्तिस्मा हाय, अन् जोपरेंत ते दुख नाई होणार तोपरेंत मी खूप व्याकूळ हावो. 51काय तुमाले वाटते कि मी पृथ्वीवर लोकायमध्ये शांती आणाले आलो, पण मी तुमाले सांगतो फुट पाड्याले आलो हाय. 52कावून कि, आतापासून एका घरात पाच जन आपसा-आपसात, विरोध करतीन तिघं दोघाय संग अन् दोघं तिघांय संग. 53बाप पोराच्या विरोधात अन् पोरगा बापाच्या विरोधात होईन, माय पोरी विरोधात अन् पोरगी माय विरोधात अन्, सासू सुनी विरोधात अन् सूनं सासू विरोधात होईन.”
वेळेची ओयख
(मत्तय 16:2-3)
54अजून त्यानं लोकायले म्हतलं, “जवा तुमी ढगाले पश्चिमेकडून चढतांना पायतां, तवा तुमी एकदम म्हणता कि पाणी येते अन् तसचं होते. 55अन् दक्षिणेचा वारा सुटतो तवा म्हणता, कड्याक्याची गर्मी होईन असं म्हणता अन् तसचं होते. 56अरे कपटी, तुमी जमिनीतले अन् अभायातले भेद लक्षणे करता येतात, पण या युगाचा भेद लक्षणे का नाई करता येत.”
आपल्या समस्याले सोडवण
(मत्तय 5:25-26)
57“तुमी सोताचं कावून निर्णय घेत ना, कि बराबर काय हाय? 58अन् तू आपल्या दुश्मना बरोबर अधिकाऱ्यापासी जातांना रस्त्यानं त्याच्या संग लवकर मेलमिलाप करून घे, असं नाई व्हावं कि तो तुले न्यायाधीशापासी ओढत नेईन अन् न्यायाधीश तुले शिपायाच्या हाती देईन व शिपाई तुले जेलात टाकीन, 59मी तुमाले सांगतो, कि जोपर्यंत तू कवडी-कवडी भरून देशीन नाई तोपरेंत सुटणार नाई.”
Terpilih Sekarang Ini:
लुका 12: VAHNT
Highlight
Kongsi
Salin
Ingin menyimpan sorotan merentas semua peranti anda? Mendaftar atau log masuk
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.