पुनर्स्थापनेची निवड करणेनमुना
आपण पुनर्स्थापनेची मनापासून इच्छा का केली पाहिजे - येशूने वचन दिलेले विपुल जीवन जगण्यासाठी
योहानाच्या 10 व्या अध्यायात येशू स्वतःला‘उत्तम मेंढपाळ’म्हणतो आणि म्हणतो की तो आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देईल. त्याने असेही म्हटले की त्याची मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि त्याचे अनुसरण करतात. मग तो त्याच्यात आणि चोरात फरक करतो. चोर,जसे आपल्याला माहीत आहे,फक्त चोरी करण्यासाठी,घात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी येतो,तर ख्रिस्त विपुल जीवन देण्यासाठी येतो.
शत्रू कोणत्याही किंमतीत पुनर्स्थापनेत अडखळण आणण्याचा प्रयत्न करेल कारण पुनर्स्थापित ख्रिस्ती क्रांतिकारक असेल!
तो तुम्हाला समजावेल की तुमचे भावनात्मक आरोग्य महत्वाचे नाही. तो तुम्हाला तोंड बंद ठेवण्यास प्रोत्साहन देईल आणि तुम्हाला हा विश्वास घडवून देईल की तुमच्या समस्या मोठी बात नाहीत कारण इतर लोकांच्या समस्या तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत. तो तुम्हाला अल्पकालीन आनंदाने आंधळे करेल जेणेकरून तुम्ही तुमचा आनंद कायमचा गमवावा.
विपुल जीवन म्हणजे जिथे आपला आत्मा समृद्ध होतो - जिथे सर्व ठिपके जोडले गेले आहेत,सर्व वेदना संपल्या आहेत किंवा सर्व समस्या जुळल्या आहेत असे नाही. त्याऐवजी,हे असे जीवन आहे जिथे आपला आंतरिक मनुष्य देवाच्या आत्म्याने संजीवित होतो आणि पुनर्स्थापित केला जातो जेणेकरून ज्या गोष्टींस आपण तोंड देतो त्या आपणास सांभाळता याव्या - मग ती मृत्यूचे दरी असो किंवा शत्रूचा आपल्यावर सर्वांगीण हल्ला असो.
ते तुमच्यावर अवलंबून आहे.
जर तुम्हाला विपुल जीवन हवे असेल,तर तुम्हाला आतून बाहेरून पुनर्स्थापित करण्यासाठी देवाला जागा द्यावी लागेल. शत्रू तुमची विपुलता चोरण्याचा,तुमचा आनंद मारण्याचा आणि तुमची शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न करेल,तर येशू,उत्तम मेंढपाळ हे सर्व आणि बरेच काही पुनर्स्थापित करण्यासाठी सर्वकाही करेल.
विचार करा:
तुम्ही तुमच्यासाठी असलेले विपुल जीवन जगत आहात का?कोणती गोष्ट तुम्हाला रोखून धरत आहे असे तुम्हाला वाटते?
त्यासाठी प्रार्थना करा:
विश्वास ठेवा आणि प्रार्थना करा की ख्रिस्तामध्ये तुम्हाला विपुल जीवन लाभावे. शत्रूने तुमच्यापासून चोरलेली वर्षे पुनर्स्थापित करण्यासाठी देवाला विनंती करा.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
देवाचा आत्मा आपल्या दैनंदिन नूतनीकरणात आणि परिवर्तनामध्ये सक्रियपणे सहभागी असतो जेणेकरून आपण येशूसारखे अधिकाधिक प्रकट व्हावे. पुनर्स्थापन हा या नूतनीकरणाच्या कार्याचा एक भाग आहे आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. त्यावाचून, आपण जुन्या पद्धती, वृत्ती, सवयी आणि वर्तनांपासून मुक्त होऊ शकणार नाही. ही बायबल योजना तुम्हाला पुनर्स्थापनाच्या आजीवन प्रवासाची पहिली पावले उचलण्यास मदत करेल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/christinegershom/