देवाला प्रथम स्थान द्यानमुना
“देवाने तुम्हाला त्याच्या हृदयात प्रथम स्थान दिले आहे”
जर कोणी तुम्हाला सांगितले की, देव तुमच्याकडे असे पाहतो की, जणू तुम्ही कधी पाप केलेच नाही? वस्तुस्थिती अशी आहे की, वधस्तंभावरील येशूच्या मुक्तिच्या कार्यामुळे, देव आपल्याकडे नेमका तसाच पाहतो. ख्रिस्ती म्हणून आपल्याला क्षमा मिळाली आहे, आपल्याला शुद्ध करण्यात आले आहे आणि आपण मुक्त झालो आहोत!
याचा अर्थ असा की तुम्ही एक संत/पवित्र जन आहात : ज्याने ख्रिस्तामध्ये नीतिमत्वाचे विशेष स्थान प्राप्त केले आहे. तुम्ही देवाच्या दृष्टीने परिपूर्ण, पवित्र आणि निर्दोष आहात. तो आपल्याला त्याचे मूल, त्याच्या विपुलतेचा वारसदार आणि त्याचा मित्र म्हणतो.
“पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.” १ पेत्र २:९
देव आपल्याकडे कसा पाहतो हे खरोखर समजून घेण्याची सुरुवात आपण त्याच्याकडे कसे पाहतो यापासून होते. आपण काही चूक करावी मग देवाने आपल्याला शिक्षा द्यावी यासाठी देव आपल्याकडे दूरवरून नजर ठेवत नाही. सत्याच्या पलीकडे काहीही असू शकत नाही.
या वचनात काय म्हटले आहे ते विचारात घ्या:
"परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला." योहान १:१२-१३
देव आपल्यापैकी प्रत्येकाकडे त्याचे मौल्यवान मूल म्हणून पाहतो. तो एक प्रेमळ पिता आहे जो आपल्या अनंत करुणेतून आपल्यावर कृपेचा वर्षाव करतो आणि आपली काळजी घेतो. शलमोनाच्या गीतातील काही शास्त्रवचने पती-पत्नीच्या जिव्हाळ्याच्या प्रेमाशी तुलना करून देवाच्या आपल्यावरील प्रेमाच्या अविश्वसनीय तीव्रतेचे वर्णन करतात. इब्री लोकांस ११:६ आपल्याला सांगते की देव त्याला शोधणाऱ्यांना प्रतिफळ देतो.
देव आपल्या प्रत्येक मुलाकडे आपल्यापैकी बहुतेक जण स्वतःला पाहत असतात त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने पाहतो. देव आपल्यापैकी प्रत्येकाकडे कसा पाहतो हे समजून घेणे ख्रिस्ताने तारण मिळाल्या क्षणी आपल्या जीवनात सुरू केलेल्या कार्यावर आधारित आहे.
"म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे." २ करिंथ. ५:१७
"ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरिता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे." २ करिंथ. ५:२१
ही नवी उत्पत्ती देवाचे दैवी कार्य आहे; आपल्या आध्यात्मिक स्थितीचे आणि आंतरिक व्यक्तीचे संपूर्ण परिवर्तन. त्याने आपल्याला पूर्णपणे क्षमा केली आहे आणि आपल्या पापांपासून शुद्ध केले आहे - भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. आपले त्याच्याशी योग्य नातेसंबंध आहेत.
“पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.” स्तोत्र १०३:१२
आपण देवाचे लोक आहोत ज्याला पापाचा कोणताही डाग न लावता त्याला सादर केले गेले आहोत; येशूने वधस्तंभावर केलेल्या कार्याद्वारे खरोखरच त्याची धार्मिकता म्हणून. देवाने खरंच आपल्याला त्याच्या हृदयात प्रथम स्थान दिले आहे!
या योजनेविषयी
देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणे ही काही एक वेळची घटना नाही... ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही विश्वासात नवीन असाल किंवा ख्रिस्ताचे "अनुभवी" अनुयायी असाल, तरीही, तुम्हाला ही योजना समजण्यास आणि लागू करण्यास सोपी वाटेल आणि विजयी ख्रिस्ती जीवनासाठी एक अत्यंत प्रभावी धोरण वाटेल. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr |