YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उद्दिष्टपूर्ण जीवन जगा!नमुना

उद्दिष्टपूर्ण जीवन जगा!

7 पैकी 1 दिवस

"सुवर्ण नियम"

राजकारणी असो, व्यावसायिक नेता असो, प्रेरक वक्ता असो किंवा केवळ सर्व सामान्य व्यक्ती असो, सर्वच क्षेत्रांतील लोक अधूनमधून सुवर्ण नियमाच्या गुणांचा उल्लेख करतात. खरं तर, जवळजवळ प्रत्येकाने त्याविषयी ऐकले आहे आणि त्याचा अर्थ त्यांना माहित आहे.

"लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा" हा समाजाचा आवश्यक भाग आहे हे बहुतेक लोक मान्य करतील. अनेक बाबतीत, आपली संस्कृती, कुटुंबे आणि मैत्री यांना एकत्र बांधून ठेवणारा हा धागा आहे. इतरांची सेवा करणे, उदारता वाढविणे आणि गरजूंना मदत करणे हे गुण सुवर्ण नियम दर्शवितो.

येशू हा सुवर्ण नियमाचा कर्ता होता जो यशस्वी ख्रिस्ती जीवन जगण्याच्या मुख्य प्राधान्यांपैकी एक आहे. येशू म्हणाला:

"ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्टग्रंथ ह्यांचे सार हेच आहे." मत्तय ७:१२

ख्रिस्ती या नात्याने, देव आपल्यापैकी प्रत्येकाला आपला विश्वास केवळ देवावर विश्वास ठेवण्यापलीकडे असलेल्या पातळीवर नेण्यासाठी बोलावतो. त्याची इच्छा अशी आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने इतरांच्या जीवनाला स्पर्श करून आपला विश्वास कृतीत आणावा आणि अशा प्रकारे देवाचे प्रेम आणि कृपा दाखवून त्यांचे गौरव करावे. हे खरोखर सुवर्ण नियमानुसार जगणे आहे.

पवित्र शास्त्र

दिवस 2

या योजनेविषयी

उद्दिष्टपूर्ण जीवन जगा!

आनंदी, उद्दिष्टपूर्ण जगणे नातेसंबंध, प्रेम आणि विश्वासावर आधारित आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेबद्दल अधिक स्पष्टता शोधत असाल तुमचा पाठपुरावा आणि शोधावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी या योजनेत स्वतःला गुंतवा. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr