YouVersion लोगो
सर्च आयकॉन

तुमची सर्वोत्तम गुंतवणूक!नमुना

तुमची सर्वोत्तम गुंतवणूक!

5 पैकी 3 दिवस

"नियमितपणे पवित्र शास्त्र वाचा"

आपल्यापैकी बरेच जण हे मान्य करतील की पवित्र शास्त्रात भरपूर वाचन उपलब्ध आहे - त्यापैकी काही कधीकधी जबरदस्त आणि अस्पष्ट वाटू शकतात. येथे पवित्र शास्त्राबद्दल काही तथ्ये आहेत जी तुम्हाला तुमच्या वाचनाच्या वेळेत संदर्भ आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील..

प्रथम, तुम्हाला आढळेल की पवित्र शास्त्र दोन विभागांमध्ये विभागले गेले आहे:

जुना करार म्हणजे जगाच्या निर्मितीपासून सुरू झालेल्या लेखनाचे संकलन, इस्राएल लोकांचा इतिहास - ज्यात एक राष्ट्र म्हणून त्यांचा पराभव, परिणामी त्यांच्या शत्रूंद्वारे बंदिवासात नेले जाणे आणि शेवटी ख्रिस्ताच्या जन्माच्या काही वर्षांपूर्वी पुन्हा एकदा यरूशलेम ताब्यात घेण्यास परत जाणे यांचा समावेश आहे. जुना करार हा इस्राएल लोकांसाठी देवाचा नियम आहे.

नवीन करार हा येशूच्या जन्मापूर्वी सुरू झालेल्या लेखनाचे संकलन आहे, त्याचे जीवन आणि सेवाकार्य, आपला तारणहार म्हणून त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान आणि शेवटी जगभरात त्याच्या मंडळीची स्थापना आणि विस्तार करणे. नवीन करारात प्रकट केल्याप्रमाणे कृपेने ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्याचा संदेश जुन्या करारात लादलेल्या कर्मकांडांची आवश्यकता पूर्ण करतो आणि त्याची जागा घेतो.

दुसरे, आणि सर्वसाधारणपणे सांगायचे तर, बायबलमधील जुन्या आणि नवीन करारांमध्ये आपल्याला तीन प्रकारचे लेखन आढळेल:

ऐतिहासिक वृत्तांत - सत्यकथा सांगणारे आणि लोकांचा व महत्त्वाच्या घटनांचा महत्त्वाचा ऐतिहासिक दृष्टीकोन देणारे लेखन.

निर्देशात्मक लेखन - ख्रिस्ती जीवनाच्या अनेक पैलूंवर, चर्चसंघटना आणि वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबींवर विशेषत: घटनांचा काही ऐतिहासिक लेखाजोखा न देता मार्गदर्शन देणारी पुस्तके आणि वचने.

प्रेरणादायी लेखन - लेखकाकडून वाचकाला उत्तेजन, प्रोत्साहन देण्यासाठी आणि भावना व्यक्त करण्यासाठी रचलेले काव्यात्मक, कलात्मक लेखन.

येशूच्या जीवनाचा आणि सेवेचा ऐतिहासिक लेखाजोखा देणारे नवीन करारातील लेखन म्हणजे मत्तय, मार्क, लूक आणि योहान. या चार पुस्तकांना शुभवर्तमाने असेही संबोधले जाते. प्रेषितांचे पुस्तक हे नवीन करारातील आणखी एक ऐतिहासिक पुस्तक आहे जे येशूच्या मृत्यूनंतर आणि पुनरुत्थानानंतर ख्रिस्ती मंडळीच्या स्थापनेचा आणि विस्ताराचा इतिहास देते.

नवीन करारातील पुस्तके जी शिकवण मांडतात ती रोमकरांस पत्र ते यहूदापर्यंत आहेत. जगभरातील इतर ख्रिस्ती लोकांना आणि मंडळींना सल्ला आणि सूचना देणारी चर्चच्या पुढाऱ्यांसाठी ही प्रत्यक्ष पत्रे आहेत.

जुन्या करारातील स्तोत्रांचे पुस्तक प्रेरणादायी लेखनाचे उत्तम उदाहरण आहे. खाली एका स्तोत्राची एक प्रेरणा आहे जी आपल्याला देवाच्या आशीर्वादांची खात्री देते जे देवाचे वचन त्यांच्या जीवनात नियमितपणे गुंतवत आहेत.

“तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते." स्तोत्र १:२-३

देवाच्या वचनाचे बीज आपल्या जीवनात रोवायचे असेल तर आपण पवित्र शास्त्र वाचणे हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवला पाहिजे. जसजसे तुमच्या जीवनात देवाच्या वचनाचे बीज फुलेल, तसतसे त्याचे आशीर्वाद अधिक स्पष्ट होतील. दुष्काळ आणि अडचणीच्या ऋतूंमध्येही तुम्हाला टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य त्याच्या वचनातून तुम्हाला मिळेल.

पवित्र शास्त्र

दिवस 2दिवस 4

या योजनेविषयी

तुमची सर्वोत्तम गुंतवणूक!

आशीर्वादित आणि मुबलक परतफेड मिळविण्याची सुरुवात योग्य गुंतवणूक करण्यापासून होते. जर तुम्ही नवीन ख्रिस्ती असाल तर देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विश्वासात मोठी गुंतवणूक करू शकत नाही. ते दररोज वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि प्रभावीपणे लागू करण्यात मदत करण्यासाठी येथे प्रारंभ करा. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr