रोमकरांस पत्र 9:1-15
रोमकरांस पत्र 9:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही; माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की, मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत; महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे; आमेन. तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही. आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे, तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर, मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा, म्हणून तिला सांगण्यात आले की, “वडील धाकट्याची सेवा करील.” त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.” तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही! कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.”
रोमकरांस पत्र 9:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे. कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन. ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत. पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन. पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत, आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे; म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत. कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’ आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी, आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्याच्या इच्छेप्रमाणे, तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’ मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो. कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’
रोमकरांस पत्र 9:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य नाही, पवित्र आत्मा माझ्या विवेकबुद्धीला पुष्टी देतो. माझे अंतःकरण मोठ्या दुःखाने व अविरत पीडेने भरून गेले आहे. मी माझ्या बंधूंसाठी जे शारीरिक रीतीने माझे स्वजातीय आहेत, त्यांच्यासाठी शापित होऊन ख्रिस्तापासून वेगळे होऊ शकलो असतो तर बरे झाले असते. हे इस्राएली लोक आहेत. त्यांनाच दत्तकपण, दैवी गौरव, करार, नियम, मंदिराची सेवा आणि अभिवचनेही दिली आहेत. पूर्वज हे त्यांचेच आहेत, त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची, जे सर्वोच्च परमेश्वर आहेत, शारीरिक वंशावळी समजते. त्यांची सर्वकाळ स्तुती असो! आमेन. तर असे नाही की परमेश्वराचे वचन अयशस्वी ठरले. इस्राएल वंशातून आलेला प्रत्येकजण इस्राएली असेल असे नाही. कारण त्याचे वंशज आहेत म्हणून ते सर्व अब्राहामाची मुले आहेत असे नाही. याउलट, “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.” याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील. कारण अशा रीतीने वचन दिले होते: “मी निश्चित वेळेत परत येईल, आणि साराहला एक पुत्र होईल.” एवढेच नव्हे, परंतु रिबेकाहच्या लेकरांचीही एकाच वेळी आपला पिता इसहाकाद्वारे गर्भधारणा झाली होती. जुळ्या मुलांचा जन्म होण्याआधी, किंवा चांगले वाईट करण्याआधी; परमेश्वराचा उद्देश निवडीसंबंधाने कायम राहावा. कृत्याने नव्हे तर पाचारण देणार्याने असे रिबेकाहला सांगितले होते, “मोठा लहान्याची सेवा करेल.” जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु मी एसावाचा द्वेष केला.” तर मग आपण काय म्हणावे? परमेश्वर अन्यायी आहे का? नक्कीच नाही. कारण ते मोशेला म्हणाले: “ज्याच्यावर मला कृपा करावयाची, त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची, त्याच्यावर मी दया करेन.”
रोमकरांस पत्र 9:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही; माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की, मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत; महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे; आमेन. तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही. आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे, तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर, मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा, म्हणून तिला सांगण्यात आले की, “वडील धाकट्याची सेवा करील.” त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.” तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही! कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.”
रोमकरांस पत्र 9:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्याच्या साहाय्याने माझ्याबरोबर साक्ष देते की, मला मोठे दु:ख वाटते व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना होतात. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे, हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्राएली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी वैभव, करारमदार, नियमशास्त्र, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून युगानुयुगे धन्य असा देव आहे. आमेन. देवाचे वचन व्यर्थ झाले, असे मी म्हणत नाही, इस्राएल वंशांतले ते सर्व इस्राएली आहेत, असे नाही. ते अब्राहामचे पुत्र आहेत म्हणून ती सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसहाकच्याच वंशाला तुझे पुत्र मानले जाईल. म्हणजे देहस्वभावानुसार झालेली मुले देवाची मुले आहेत, असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात; कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे, तर रिबकादेखील आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिली व तिच्या दोन मुलांविषयी त्यांनी काही बरे-वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प होता, म्हणजे जो कृत्यामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेनुसार होता, तो पूर्ण व्हावा म्हणून तिला सांगण्यात आले की, मोठा मुलगा धाकट्याची सेवा करील. त्याचप्रमाणे धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, ‘मी याकोबवर प्रीती केली आणि एसावचा द्वेष केला.’ तर आपण काय म्हणावे? देवाकडून अन्याय होतो काय? मुळीच नाही! कारण तो मोशेला म्हणतो, ‘ज्या कोणावर मला दया करावयाची आहे, त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करू इच्छितो त्याच्यावर मी करुणा करीन.’