मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य नाही, पवित्र आत्मा माझ्या विवेकबुद्धीला पुष्टी देतो. माझे अंतःकरण मोठ्या दुःखाने व अविरत पीडेने भरून गेले आहे. मी माझ्या बंधूंसाठी जे शारीरिक रीतीने माझे स्वजातीय आहेत, त्यांच्यासाठी शापित होऊन ख्रिस्तापासून वेगळे होऊ शकलो असतो तर बरे झाले असते. हे इस्राएली लोक आहेत. त्यांनाच दत्तकपण, दैवी गौरव, करार, नियम, मंदिराची सेवा आणि अभिवचनेही दिली आहेत. पूर्वज हे त्यांचेच आहेत, त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची, जे सर्वोच्च परमेश्वर आहेत, शारीरिक वंशावळी समजते. त्यांची सर्वकाळ स्तुती असो! आमेन. तर असे नाही की परमेश्वराचे वचन अयशस्वी ठरले. इस्राएल वंशातून आलेला प्रत्येकजण इस्राएली असेल असे नाही. कारण त्याचे वंशज आहेत म्हणून ते सर्व अब्राहामाची मुले आहेत असे नाही. याउलट, “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.” याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील. कारण अशा रीतीने वचन दिले होते: “मी निश्चित वेळेत परत येईल, आणि साराहला एक पुत्र होईल.” एवढेच नव्हे, परंतु रिबेकाहच्या लेकरांचीही एकाच वेळी आपला पिता इसहाकाद्वारे गर्भधारणा झाली होती. जुळ्या मुलांचा जन्म होण्याआधी, किंवा चांगले वाईट करण्याआधी; परमेश्वराचा उद्देश निवडीसंबंधाने कायम राहावा. कृत्याने नव्हे तर पाचारण देणार्याने असे रिबेकाहला सांगितले होते, “मोठा लहान्याची सेवा करेल.” जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु मी एसावाचा द्वेष केला.” तर मग आपण काय म्हणावे? परमेश्वर अन्यायी आहे का? नक्कीच नाही. कारण ते मोशेला म्हणाले: “ज्याच्यावर मला कृपा करावयाची, त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची, त्याच्यावर मी दया करेन.”
रोमकरांस 9 वाचा
ऐका रोमकरांस 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस 9:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ