YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 12:17-21

रोमकरांस पत्र 12:17-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा. प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’ पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.

रोमकरांस पत्र 12:17-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो. उलटपक्षी, “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखार्‍यांची रास करशील.” वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक.

रोमकरांस पत्र 12:17-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा. सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा धर्मशास्त्रलेख आहे: ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन’, असे प्रभू म्हणतो. उलटपक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे. तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर चांगुलपणाने वाइटाला जिंक.