वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा. साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा. माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; आणि मी परतफेड करीन,” असे प्रभू म्हणतात. त्याउलट: “तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या. असे केल्याने तुम्ही त्याच्या मस्तकावर निखार्यांची रास कराल.” वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटाला जिंका.
रोमकरांस 12 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस 12:17-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ