YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 11:1-18

रोमकरांस पत्र 11:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर मी विचारतो, ‘देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?’ कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ‘त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.’ एलीयाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की, “हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या; आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घेण्यास ते पाहतात.” परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? “ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.” तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे; आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.] तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही; पण निवडलेल्या लोकांना मिळाले; आणि बाकीचे कोडगे झाले. “आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये असे कान दिले,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. दावीदही म्हणतो, “त्यांचे मेज त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे होवो. त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव.” तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ‘ईर्ष्या निर्माण होण्यासाठी’ त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा र्‍हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल! पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो; ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना? कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की, तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.

रोमकरांस पत्र 11:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तर मी म्हणतो की, देवाने आपल्या लोकांस नाकारले आहे काय? कधीच नाही कारण मीही इस्राएली आहे, अब्राहामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलीयाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की, ‘प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारले आहे आणि तुझ्या वेद्या खणून पाडल्या आहेत; आणि मी एकटा राहिलो आहे आणि ते माझ्या जीवावर टपले आहेत.’ पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ‘ज्यांनी बआलाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’ मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे. आणि जर कृपेने आहे, तर कृतीवरून नाही; तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही. मग काय? इस्राएल जे मिळवू पाहत आहे ते त्यास मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले. कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’ त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की, ‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा, आणि अडथळा व प्रतिफळ होवो. त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’ मग मी विचारतो की, इस्राएलाने पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परराष्ट्रीयांकडे आले आहे. आता, त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल? पण, तुम्ही जे परराष्ट्रीय आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो. यहूदी म्हणजे माझ्या देहाचे आहेत त्यांना मी शक्य त्याद्वारे ईर्ष्येस चढवून त्यांच्यामधील काहींचे तारण करावे. कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाशी समेट आहे तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतांतून जीवन नाही काय? कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत. आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे.

रोमकरांस पत्र 11:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे. ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते अशा आपल्या लोकांचा परमेश्वराने त्याग केला नाही. वचनामध्ये एका भागात एलीयाहबद्दल म्हटले, ते तुम्हाला माहीत नाही का—इस्राएलविरुद्ध परमेश्वराजवळ त्याने कशी विनंती केली: “प्रभू, त्यांनी तुमच्या संदेष्ट्यांना मारून टाकले आहे, आणि तुमच्या वेद्या फोडल्या आहेत; मी एकटाच उरलो आहे, आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.” यावर परमेश्वराचे त्याला काय उत्तर होते? “मी माझ्याकरिता सात हजार लोक राखून ठेवले आहेत आणि ज्यांनी बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत.” वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत, आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही. मग काय? इस्राएली लोकांनी जे झटून शोधले ते त्यांना मिळालेले नाही. जे निवडलेले होते त्यांना मिळाले, पण इतरजण कठीण झाले, जसे लिहिले आहे: “परमेश्वराने त्यांना धुंदीचा आत्मा दिला आहे, त्यांचे डोळे पाहू शकत नाहीत व कान ऐकू शकत नाहीत, आणि असे आज या दिवसापर्यंत चालले आहे.” दावीद राजा म्हणाला: “त्यांचा मेज सापळा व पाश, त्यांना अडखळविण्याचा धोंडा आणि प्रतिफळ असा होवो. त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.” मी पुन्हा विचारतो: ते असे अडखळले की परत उभे राहू शकणार नाहीत का? नक्कीच नाही! त्यांच्या पापांमुळे, गैरयहूदी लोकांना तारण प्राप्त होईल, म्हणजे इस्राएल ईर्षेला पेटतील. त्यांच्या पापांचा परिणाम म्हणून जग आत्मिकरित्या धनवान झाले आणि त्यांचे नुकसान म्हणजे गैरयहूदीयांचे आत्मिक धन झाले, तर मग त्यांचे भरून येणे कितीतरी आत्मिक आशीर्वादाने धनयुक्त होईल! मी जे तुम्ही गैरयहूदी आहात, त्यांच्यासोबत बोलतो. मी जितका गैरयहूदीयांसाठी प्रेषित आहे, तेवढाच मी माझ्या सेवेचा अभिमान बाळगतो. या आशेने की कसेही करून मी माझ्या लोकांमध्ये हेवा निर्माण करून त्यांच्यापैकी काही जणांचे तारण साधावे. त्यांच्या नकारामुळे जगाचा समेट झाला तर त्यांची स्वीकृती मरणातून जीवन होणार नाही का? आणि आता पिठाच्या गोळ्यापैकी काही भाग प्रथमफळ म्हणून पवित्र आहे तर, सर्वच पिठाचा गोळाही पवित्र ठरेल; जर मुळे पवित्र असली, तर फांद्याही असणार. जर काही फांद्या मोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही, जे रानटी जैतून, त्यांच्यामध्ये कलमरूपे लावले तर तुम्ही जैतून वृक्षाच्या मुळातून होणार्‍या पौष्टिकतेचे वाटेकरी झाला आहात. परंतु इतर फांद्यापेक्षा स्वतःला विशेष समजू नका. हे लक्षात ठेवा: तुम्ही मुळाला आधार देत नाही, परंतु मूळ तुम्हाला आधार देते.

रोमकरांस पत्र 11:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर मी विचारतो, ‘देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?’ कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ‘त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.’ एलीयाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की, “हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या; आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घेण्यास ते पाहतात.” परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? “ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.” तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे; आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.] तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही; पण निवडलेल्या लोकांना मिळाले; आणि बाकीचे कोडगे झाले. “आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये असे कान दिले,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. दावीदही म्हणतो, “त्यांचे मेज त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे होवो. त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव.” तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ‘ईर्ष्या निर्माण होण्यासाठी’ त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा र्‍हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल! पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो; ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना? कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की, तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.

रोमकरांस पत्र 11:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? मुळीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामच्या कुळातला, बन्यामिनच्या वंशातला आहे. ज्यांची त्याने सुरुवातीपासून निवड केली, त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत धर्मशास्त्र काय म्हणते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली: ‘हे प्रभो, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या. मी एकटाच राहिलो आहे, ते माझा प्राण घ्यायचा प्रयत्न करीत आहेत.’ परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ‘ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.’ तसेच ह्रीच्या काळीसुद्धा देवाने त्याच्या कृपेने निवडलेल्यांपैकी शेष भाग राखला आहे आणि जर हा शेष भाग कृपेने राखला असेल, तर ते कृत्यांनी झाले नाही. नाहीतर कृपा ही कृपा राहणार नाही. तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल नेटाने प्रयत्न करत होते, ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांच्या गटाला मिळाले आणि बाकीचे लोक कठिण अंत:करणाचे झाले. धर्मशास्त्रलेखात म्हटल्याप्रमाणे: देवाने त्यांचे मन आणि अंतःकरण संवेदनशून्य केले. आजही ते ऐकू वा पाहू शकत नाहीत. दावीददेखील म्हणतो: त्यांचे सण त्यांना फास व सापळा, अडखळण व शिक्षा असे होवोत. त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत आणि तू त्यांना नेहमी वाकव. तर मी विचारतो, यहुदी लोकांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? मुळीच नाही! तर त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधामुळे यहुदीतरांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध हा जर जगासाठी आशीर्वाद आणि त्यांचा ऱ्हास हा जर यहुदीतरांसाठी आशीर्वाद ठरला आहे, तर त्या सर्वांचा समावेश झाल्यास तो आशीर्वाद किती तरी अधिक महान होईल! यहुदीतरांकरता प्रेषित ह्या नात्याने मी सांगतो की, मी माझ्या सेवाकार्याचा अभिमान बाळगतो. ह्यात माझा उद्देश असा आहे की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत, त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करावी व त्यांच्यांतील काहींना तारावे. त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार आहे! पिठाच्या गोळ्याचा पहिला भाग देवाला अर्पण केल्यास पवित्र होतो तेंव्हा संपूर्ण गोळा पवित्र होतो आणि जर मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र. अस्सल अशा ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू जंगली ऑलिव्ह झाडाच्या फांदीसारखा असता त्यांच्या जागी कलमरूपे जर लावला गेलास व अस्सल अशा कसदार ऑलिव्ह वृक्षाच्या मुळाचा भागीदार झालास, तर ‘त्या फांद्यांहून मी मोठा आहे,’ अशी बढाई मारू नकोस. मारशील, तर हे लक्षात ठेव की, तू केवळ एक फांदी आहेस, तू मुळाला आधार दिलेला नाही, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.