स्तोत्रसंहिता 90:10-12
स्तोत्रसंहिता 90:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो. तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो? म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
स्तोत्रसंहिता 90:10-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्हाला सत्तर वर्षाचे आयुष्य दिले आहे; आणि सशक्त असल्यास ऐंशी वर्षे; परंतु यातील उत्तम वर्षेदेखील पुष्कळदा त्रास आणि दुःखे यांनीच भरलेली असतात; लवकरच ती सरतात आणि आम्ही निघून जातो. तुमच्या संतापाची भयानकता जाणू शकलो असतो, तर बरे झाले असते! तुमचा क्रोध तितकाच व्यापक आहे, जितकी त्याची भीती. आमच्या जीवनाचे दिवस मोजणे आम्हाला शिकवा, जेणेकरून आमचे अंतःकरण सुज्ञ होईल.
स्तोत्रसंहिता 90:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे? ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.