स्तोत्रसंहिता 86:14-16
स्तोत्रसंहिता 86:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत. हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे. त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही. तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे; आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर.
स्तोत्रसंहिता 86:14-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे परमेश्वरा, उन्मत्त शत्रू माझ्यावर हल्ला करतात; निर्दयी लोकांची टोळी माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे— त्यांना तुमची काहीही कदर नाही. परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात. माझ्याकडे वळून मजवर दया करा; आपल्या सेवकाच्या वतीने आपले सामर्थ्य दाखवून द्या; माझे तारण करा, कारण माझ्या आईप्रमाणेच मी देखील तुमची सेवा करतो.
स्तोत्रसंहिता 86:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे देवा, उन्मत्त लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत, जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घेण्यास पाहत आहे; ते तुला जुमानत नाहीत. तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे, आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर.