YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 68:19-35

स्तोत्रसंहिता 68:19-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे. आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे. पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल. परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन. यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा, आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा. हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत. गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत, आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत. मंडळीत देवाचा धन्यवाद करा; जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ, यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत. तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव. यरूशलेमातील मंदिराकरता, राजे तुला भेटी आणतील. लव्हाळ्यात राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक. मिसरमधून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा, परमेश्वराची स्तुतिगीते गा. जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो; पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो. देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे वैभव आणि आकाशात त्याचे बल आहे. हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे; इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.

स्तोत्रसंहिता 68:19-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वर, आमचे प्रभू, आमच्या तारकाचे स्तवन होवो, ते दररोज आमची ओझी वाहतात. सेला आमचे परमेश्वरच, असे परमेश्वर आहेत जे आम्हाला तारण देतात; आम्हाला मृत्यूपासून वाचविणारे सार्वभौम याहवेहच आहेत. परमेश्वर खात्रीने आपल्या शत्रूंची आणि पापमार्गाला चिकटून राहणार्‍या लोकांची डोकी फोडतील. प्रभूने घोषणा केली, “बाशान येथून मी तुझे शत्रू पुन्हा आणेन; समुद्राच्या तळातून मी त्यांना पुन्हा वर आणेन, म्हणजे तुम्ही त्यांच्या रक्ताच्या पाटातून चालाल आणि तुमच्या कुत्र्यांना ते रक्त मनसोक्त चाटता येईल.” हे परमेश्वरा, तुमची मिरवणूक आता दिसू लागली आहे; पवित्रस्थानाकडे माझ्या परमेश्वराची, माझ्या राजाची, मिरवणूक चालली आहे. गाणारे पुढे, वाद्ये वाजविणारे मागे आणि त्या दोहोंच्यामध्ये कुमारिका खंजिर्‍या वाजवित चालल्या आहेत. महासभेत परमेश्वराची स्तुती करोत; इस्राएलाच्या सभेत याहवेहची स्तुती करोत. बिन्यामीनचा छोटा वंश नेतृत्व करीत पुढे चालला आहे, यहूदाह वंशाचे अधिपती आणि जबुलून व नफताली वंशाचे अधिपती त्यामध्ये आहेत. हे परमेश्वरा, तुमचे बळ एकवटून; तुम्ही आमच्यासाठी पूर्वी केले, तसे तुमचे सामर्थ्य प्रगट करा. पृथ्वीवरील राजे यरुशलेमातील तुमच्या मंदिराच्या गौरवामुळे तुम्हाला भेटी घेऊन येत आहेत. हे परमेश्वरा, लव्हाळ्यात राहणार्‍या वनपशूंना, बैलांचा कळप आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वासरांना धमकावा; खंडणीची तीव्र इच्छा बाळगणार्‍यांना पायाखाली तुडवा, आणि युद्धात आनंद मानणार्‍या राष्ट्रांची दाणादाण करा. इजिप्त देशातून राजदूत येतील; कूश परमेश्वरापुढे नम्र होईल. पृथ्वीवरील राष्ट्रांनो, परमेश्वराचे गुणगान गा, प्रभूचे स्तवन करा, सेला अनादि काळापासून अत्युच्च आकाशात स्वारी करतात, ज्यांचा प्रचंड आवाज ढगांच्या गर्जनांसारखा आहे. परमेश्वराच्या सामर्थ्याची घोषणा करा; त्यांचे ऐश्वर्य इस्राएलवर प्रकाशित आहे; त्यांचे महान सामर्थ्य आकाशात आहे. परमेश्वरा, तुम्ही आपल्या पवित्रस्थानात भयावह आहात; इस्राएलचे परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य आणि बळ देतात.

स्तोत्रसंहिता 68:19-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो; देव आमचे तारण आहे. (सेला) देव आम्हांला संकटांतून मुक्त करणारा देव आहे; आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे. देव निश्‍चये आपल्या वैर्‍यांचे मस्तक फोडील, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील. प्रभू म्हणाला, “बाशानापासून मी त्यांना परत आणीन, समुद्राच्या खोल डोहातून त्यांना परत आणीन; ह्यासाठी की तू आपला पाय रक्तात बुचकळावा. तुझे शत्रू तुझ्या कुत्र्यांच्या जिभांचे खाद्य व्हावे.” हे देवा, त्यांनी तुझ्या स्वार्‍या पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या स्वार्‍या त्यांनी पाहिल्या आहेत. खंजिर्‍या वाजवत जाणार्‍या कुमारींच्या मधून गाणारे पुढे व वाजवणारे मागे चालताना म्हणतात की “ज्यांचा उगम इस्राएलापासून आहे असे तुम्ही, प्रभू जो देव त्याचा जनसभांत धन्यवाद करा.” तेथे त्यांच्यावर प्रभुत्व करणारा कनिष्ठ बन्यामीन, यहूदाचे अधिपती, व त्यांच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत. तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे; हे देवा, तू आमच्यासाठी जे केले आहेस ते दृढ कर. यरुशलेमातील तुझ्या मंदिरासाठी राजे तुला भेटी आणतील. लव्हाळ्यामध्ये राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स ह्यांना धमकाव; रुप्याचा लोभ धरणार्‍या लोकांना पायाखाली तुडव. युद्धप्रिय लोकांची त्याने दाणादाण केली आहे. मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा; प्रभूची स्तोत्रे गा. (सेला) पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करतो, त्याची स्तोत्रे गा; पाहा, तो आपला शब्द, सामर्थ्याचा शब्द, उच्चारतो. देवाच्या बलाचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे ऐश्वर्य आणि गगनमंडळात त्याचे बळ आहे. तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांना बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.

स्तोत्रसंहिता 68:19-35

स्तोत्रसंहिता 68:19-35 MARVBSIस्तोत्रसंहिता 68:19-35 MARVBSIस्तोत्रसंहिता 68:19-35 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा