परमेश्वर, आमचे प्रभू, आमच्या तारकाचे स्तवन होवो, ते दररोज आमची ओझी वाहतात. सेला आमचे परमेश्वरच, असे परमेश्वर आहेत जे आम्हाला तारण देतात; आम्हाला मृत्यूपासून वाचविणारे सार्वभौम याहवेहच आहेत. परमेश्वर खात्रीने आपल्या शत्रूंची आणि पापमार्गाला चिकटून राहणार्या लोकांची डोकी फोडतील. प्रभूने घोषणा केली, “बाशान येथून मी तुझे शत्रू पुन्हा आणेन; समुद्राच्या तळातून मी त्यांना पुन्हा वर आणेन, म्हणजे तुम्ही त्यांच्या रक्ताच्या पाटातून चालाल आणि तुमच्या कुत्र्यांना ते रक्त मनसोक्त चाटता येईल.” हे परमेश्वरा, तुमची मिरवणूक आता दिसू लागली आहे; पवित्रस्थानाकडे माझ्या परमेश्वराची, माझ्या राजाची, मिरवणूक चालली आहे. गाणारे पुढे, वाद्ये वाजविणारे मागे आणि त्या दोहोंच्यामध्ये कुमारिका खंजिर्या वाजवित चालल्या आहेत. महासभेत परमेश्वराची स्तुती करोत; इस्राएलाच्या सभेत याहवेहची स्तुती करोत. बिन्यामीनचा छोटा वंश नेतृत्व करीत पुढे चालला आहे, यहूदाह वंशाचे अधिपती आणि जबुलून व नफताली वंशाचे अधिपती त्यामध्ये आहेत. हे परमेश्वरा, तुमचे बळ एकवटून; तुम्ही आमच्यासाठी पूर्वी केले, तसे तुमचे सामर्थ्य प्रगट करा. पृथ्वीवरील राजे यरुशलेमातील तुमच्या मंदिराच्या गौरवामुळे तुम्हाला भेटी घेऊन येत आहेत. हे परमेश्वरा, लव्हाळ्यात राहणार्या वनपशूंना, बैलांचा कळप आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वासरांना धमकावा; खंडणीची तीव्र इच्छा बाळगणार्यांना पायाखाली तुडवा, आणि युद्धात आनंद मानणार्या राष्ट्रांची दाणादाण करा. इजिप्त देशातून राजदूत येतील; कूश परमेश्वरापुढे नम्र होईल. पृथ्वीवरील राष्ट्रांनो, परमेश्वराचे गुणगान गा, प्रभूचे स्तवन करा, सेला अनादि काळापासून अत्युच्च आकाशात स्वारी करतात, ज्यांचा प्रचंड आवाज ढगांच्या गर्जनांसारखा आहे. परमेश्वराच्या सामर्थ्याची घोषणा करा; त्यांचे ऐश्वर्य इस्राएलवर प्रकाशित आहे; त्यांचे महान सामर्थ्य आकाशात आहे. परमेश्वरा, तुम्ही आपल्या पवित्रस्थानात भयावह आहात; इस्राएलचे परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य आणि बळ देतात.
स्तोत्रसंहिता 68 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 68:19-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ