YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 22:3-10

स्तोत्रसंहिता 22:3-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्‍या, तू पवित्र आहेस. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास. ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत. मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात; ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.” परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस; मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस. मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे; मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस.

स्तोत्रसंहिता 22:3-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस. आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही. परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे. सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात. ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस, मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले. मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस.

स्तोत्रसंहिता 22:3-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तरीपण तुम्ही पवित्र आहात; इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात. तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले. त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही. परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही, मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे. मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत, ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.” तुम्हीच मला माझ्या आईच्या उदरातून सुखरुप बाहेर काढले; मी माझ्या आईच्या कुशीत होतो, तेव्हापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे; मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे. मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात.

स्तोत्रसंहिता 22:3-10

स्तोत्रसंहिता 22:3-10 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा