YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 22:3-10

स्तोत्रसंहिता 22:3-10 MRCV

तरीपण तुम्ही पवित्र आहात; इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात. तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले. त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही. परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही, मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे. मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत, ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.” तुम्हीच मला माझ्या आईच्या उदरातून सुखरुप बाहेर काढले; मी माझ्या आईच्या कुशीत होतो, तेव्हापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे; मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे. मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात.