स्तोत्रसंहिता 118:1-14
स्तोत्रसंहिता 118:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्राएलाने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” परमेश्वराचे भय धरणार्यांनी म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा साहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; माझा द्वेष करणार्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरले आहे; खरोखर मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला मधमाश्यांप्रमाणे घेरले आहे; काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास, पण परमेश्वराने मला सावरले. परमेश माझे बल व माझे गीत आहे; तो माझे तारण झाला आहे.
स्तोत्रसंहिता 118:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले. परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल? माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन. त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली. परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.
स्तोत्रसंहिता 118:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे. इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.” अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.” याहवेहचे भय धरणारे म्हणोत, “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.” संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले. याहवेह माझ्यासोबत आहेत, मला कशाचेही भय वाटणार नाही; नश्वर मानव मला काय करणार? याहवेह माझ्यासोबत आहेत; ते माझे सहायक आहेत. मी माझ्या शत्रूकडे विजयान्वित दृष्टीने बघेन. नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे. अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे. सर्व राष्ट्रांनी मला वेढा घातला, परंतु याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला. त्यांनी सर्व बाजूने मला वेढा घातला, परंतु याहवेहच्या नावाने मी त्यांचा नायनाट केला. मधमाश्यांप्रमाणे ते माझ्याभोवती घोंगावत होते, पण जळत्या काटेरी झुडूपांसारखे ते लगेच जळून खाक झाले; याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला. त्यांनी मला असे ढकलले की मी मागे पडलो असतो, परंतु याहवेहने मला साहाय्य केले. याहवेह माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; तेच माझे तारण झाले आहेत.