YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 118:1-14

स्तोत्रसंहिता 118:1-14 MRCV

याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे. इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.” अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.” याहवेहचे भय धरणारे म्हणोत, “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.” संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले. याहवेह माझ्यासोबत आहेत, मला कशाचेही भय वाटणार नाही; नश्वर मानव मला काय करणार? याहवेह माझ्यासोबत आहेत; ते माझे सहायक आहेत. मी माझ्या शत्रूकडे विजयान्वित दृष्टीने बघेन. नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे. अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे. सर्व राष्ट्रांनी मला वेढा घातला, परंतु याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला. त्यांनी सर्व बाजूने मला वेढा घातला, परंतु याहवेहच्या नावाने मी त्यांचा नायनाट केला. मधमाश्यांप्रमाणे ते माझ्याभोवती घोंगावत होते, पण जळत्या काटेरी झुडूपांसारखे ते लगेच जळून खाक झाले; याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला. त्यांनी मला असे ढकलले की मी मागे पडलो असतो, परंतु याहवेहने मला साहाय्य केले. याहवेह माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; तेच माझे तारण झाले आहेत.