YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 118:1-14

स्तोत्र. 118:1-14 IRVMAR

परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले. परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल? माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन. त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली. परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.