स्तोत्रसंहिता 107:1-16
स्तोत्रसंहिता 107:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे, आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकवट केले आहे. काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले; त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही. ते भुकेले व तान्हेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत; कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले; भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले. काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्युच्छायेत बसले होते, कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता. त्यांना कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरवला; ते पतन पावले, त्यांना साहाय्य करण्यास कोणी नव्हता; तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले. त्याने त्यांना अंधकारातून व मृत्युच्छायेतून बाहेर आणले. व त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत; कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले.
स्तोत्रसंहिता 107:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे. परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे, त्याने त्यांना परक्या देशातून पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशातून एकवट केले आहे. ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही. ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले. नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले. त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत. कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले. काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत. त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले. त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता. तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले. देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली. परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. कारण त्याने पितळेची दारे तोडली, आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
स्तोत्रसंहिता 107:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची दया सनातन आहे. याहवेहनी मुक्त केलेल्यांनी त्याचे कथन करावे— ज्यांची त्यांनी शत्रूपासून सुटका केली आहे, ज्यांना पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेतून एकत्र गोळा केले आहे. काहीजण उजाड प्रदेशातून भटकत होते, त्यांना स्थावर होण्यासाठी शहराकडे जाणारा मार्ग सापडत नव्हता. भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते, ते दुर्बल होऊ लागले होते. त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. त्यांनी त्यांना एका अचूक मार्गाने चालविले, आणि वस्ती करण्यास नगरात आणले. याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. कारण ते तहानेल्यास तृप्त करतात, आणि भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट करतात. काही अंधारात आणि गडद अंधकारात बसले होते, लोखंडी साखळदंडांत यातना सहन करणारे बंदिवान होते, कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली आणि परमोच्चाच्या योजनेला तुच्छ मानले. मग त्यांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले; ते पडले आणि त्यांचे साहाय्य करण्यास कोणीही नव्हते. त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. त्यांना काळोखातून आणि गडद अंधकारातून बाहेर आणले, आणि त्यांचे साखळदंड तोडून टाकले. याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. कारण त्यांनीच त्यांचे कास्याचे दरवाजे मोडले, आणि त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकल्या.