YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 107:1-16

स्तोत्रसंहिता 107:1-16 MRCV

याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची दया सनातन आहे. याहवेहनी मुक्त केलेल्यांनी त्याचे कथन करावे— ज्यांची त्यांनी शत्रूपासून सुटका केली आहे, ज्यांना पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेतून एकत्र गोळा केले आहे. काहीजण उजाड प्रदेशातून भटकत होते, त्यांना स्थावर होण्यासाठी शहराकडे जाणारा मार्ग सापडत नव्हता. भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते, ते दुर्बल होऊ लागले होते. त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. त्यांनी त्यांना एका अचूक मार्गाने चालविले, आणि वस्ती करण्यास नगरात आणले. याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. कारण ते तहानेल्यास तृप्त करतात, आणि भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट करतात. काही अंधारात आणि गडद अंधकारात बसले होते, लोखंडी साखळदंडांत यातना सहन करणारे बंदिवान होते, कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली आणि परमोच्चाच्या योजनेला तुच्छ मानले. मग त्यांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले; ते पडले आणि त्यांचे साहाय्य करण्यास कोणीही नव्हते. त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. त्यांना काळोखातून आणि गडद अंधकारातून बाहेर आणले, आणि त्यांचे साखळदंड तोडून टाकले. याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. कारण त्यांनीच त्यांचे कास्याचे दरवाजे मोडले, आणि त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकल्या.