स्तोत्रसंहिता 102:1-5
स्तोत्रसंहिता 102:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहचो. माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नकोस; तू आपला कान माझ्याकडे लाव; मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक. माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात, माझी हाडे चुलीतल्या निखार्यासारखी गळून गेली आहेत. माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही. मोठ्याने कण्हून कण्हून माझी चामडी माझ्या हाडांना चिकटून गेली आहे
स्तोत्रसंहिता 102:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे. मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे. कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत. माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. मी जेवण खाण्यास असमर्थ आहे. माझ्या सततच्या कण्हण्यामुळे, मी फार क्षीण झालो आहे.
स्तोत्रसंहिता 102:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो. मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा. कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत; माझ्या हाडांचा जळत्या कोळशासारखा दाह होत आहे. माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे; अन्न सेवन करण्याचेही मला स्मरण होत नाही. निराशेने आता अधिकच उच्चस्वरात कण्हत असून मी कातडी व हाडे यांचा सापळा झालो आहे.