हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो. मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा. कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत; माझ्या हाडांचा जळत्या कोळशासारखा दाह होत आहे. माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे; अन्न सेवन करण्याचेही मला स्मरण होत नाही. निराशेने आता अधिकच उच्चस्वरात कण्हत असून मी कातडी व हाडे यांचा सापळा झालो आहे.
स्तोत्रसंहिता 102 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 102:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ