नीतिसूत्रे 26:14-16
नीतिसूत्रे 26:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दरवाजा आपल्या बिजागर्यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो. आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. योग्य उत्तर देणार्या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 26 वाचानीतिसूत्रे 26:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो. आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते. विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 26 वाचा