फिलिप्पैकरांस पत्र 4:19-23
फिलिप्पैकरांस पत्र 4:19-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
फिलिप्पैकरांस पत्र 4:19-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यामुळे परमेश्वर स्वतः ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्या सर्व गरजा आपल्या गौरवी संपत्तीतून पुरवतील. खरोखर, आता परमेश्वर जे आपला पिता त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. तेथील सर्व पवित्र लोकांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी विचारणा सांगा. माझ्याबरोबर असलेले बंधू व भगिनी देखील तुम्हाला आपल्या शुभेच्छा पाठवितात. आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.
फिलिप्पैकरांस पत्र 4:19-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात. सर्व पवित्र जन व विशेषेकरून कैसराच्या घरचे तुम्हांला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
फिलिप्पैकरांस पत्र 4:19-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील. आपल्या देवपित्याचा युगानुयुगे गौरव होवो. आमेन. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र व्यक्तीला शुभेच्छा द्या. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात. सर्व पवित्र जन व विशेषकरून राजघराण्यातील सर्व तुम्हांला शुभेच्छा पाठवितात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर राहो.