YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 4:14-20

फिलिप्पैकरांस पत्र 4:14-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत. फिलिप्पैकरांनो, तुम्हांलाही ठाऊक आहे की, सुवार्तेच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्यावाचून दुसर्‍या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही; कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

फिलिप्पैकरांस पत्र 4:14-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्‍यांदाही माझी गरज भागविली. मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

फिलिप्पैकरांस पत्र 4:14-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तरीही तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला हे योग्य केले. फिलिप्पैकरांनो, तुम्हाला हे माहीत आहे की, शुभवार्तेच्या प्रारंभीच्या दिवसात मी मासेदोनियामधून गेलो, तेव्हा देण्याघेण्यामध्ये केवळ तुमच्याशिवाय कोणत्याच मंडळीने माझ्याशी भागीदारी केली नाही. मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली. मला तुमची देणगी पाहिजे असे नाही, तर तुमच्या हिशेबी मोबदला वाढावा किंवा तुम्हाला लाभ व्हावा अशी मी अपेक्षा करतो. मजजवळ सर्वकाही आहे आणि ते भरपूर प्रमाणात आहे! एपफ्रदीत आला, तेव्हा त्याच्याबरोबर पाठविलेल्या देणग्यांमुळे मी अगदी भरून गेलो आहे. त्या देणग्या म्हणजे परमेश्वराला मान्य, संतोष देणारा सुगंधी यज्ञच आहेत. त्यामुळे परमेश्वर स्वतः ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्या सर्व गरजा आपल्या गौरवी संपत्तीतून पुरवतील. खरोखर, आता परमेश्वर जे आपला पिता त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

फिलिप्पैकरांस पत्र 4:14-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तथापि माझ्या संकटांत तुम्ही सहभागी झालात, हे ठीक केले. फिलिप्पै येथील ख्रिस्ती लोकांनो, तुम्हांला ठाऊक आहे की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो, तेव्हा तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही ख्रिस्तमंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या खात्यात तुमची जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. माझ्याजवळ सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदीतच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंधित समर्पण असून देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील. आपल्या देवपित्याचा युगानुयुगे गौरव होवो. आमेन.