YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस 4:14-20

फिलिप्पैकरांस 4:14-20 MRCV

तरीही तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला हे योग्य केले. फिलिप्पैकरांनो, तुम्हाला हे माहीत आहे की, शुभवार्तेच्या प्रारंभीच्या दिवसात मी मासेदोनियामधून गेलो, तेव्हा देण्याघेण्यामध्ये केवळ तुमच्याशिवाय कोणत्याच मंडळीने माझ्याशी भागीदारी केली नाही. मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली. मला तुमची देणगी पाहिजे असे नाही, तर तुमच्या हिशेबी मोबदला वाढावा किंवा तुम्हाला लाभ व्हावा अशी मी अपेक्षा करतो. मजजवळ सर्वकाही आहे आणि ते भरपूर प्रमाणात आहे! एपफ्रदीत आला, तेव्हा त्याच्याबरोबर पाठविलेल्या देणग्यांमुळे मी अगदी भरून गेलो आहे. त्या देणग्या म्हणजे परमेश्वराला मान्य, संतोष देणारा सुगंधी यज्ञच आहेत. त्यामुळे परमेश्वर स्वतः ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्या सर्व गरजा आपल्या गौरवी संपत्तीतून पुरवतील. खरोखर, आता परमेश्वर जे आपला पिता त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.