गणना 26:26-65
गणना 26:26-65 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ. जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते. योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली. मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ. गिलादाची कूळे होतीः इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ. अस्रियेलाचे अस्रियेली कूळ, शेखेमाचे शेखेमी कूळ. शमीदचे शमीदाई कूळ, हेफेराचे हेफेरी कूळ. हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते. एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ. एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी. ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते. बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः बेलाचे बेलाई कूळ, आशबेलाचे आशबेली कूळ, अहीरामाचे अहीरामी कूळ. शफूफामाचे शफूफामी कूळ, हुफामाचे हुफामी कूळ. बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ. ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती. दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते. शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती. आशेराच्या कुळातील कुळे होतीः इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ. बरीयाच्या कुळातील कुळे होतीः हेबेराचे हेबेरी कूळ, मलकीएलाचे मलकीएली कूळ. आशेरला सेरा नावाची मुलगी होती. ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती. नफतालीच्या कुळातील कुळे होतीः यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ. येसेराचे येसेरी कूळ, शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ. ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती. ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती. परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे. मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल. देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा. प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील. त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ. लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता. अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते. पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले. लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही. मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली. खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते. कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.
गणना 26:26-65 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जबुलूनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : सेरेदाचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ; याहलेलाचे याहलेली कूळ; ही जबुलूनाची कुळे; ह्यांची गणती केली ती साठ हजार पाचशे भरली. योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांच्यापासून जी कुळे निर्माण झाली ती ही : मनश्शेचे वंशज हे : माखीराचे माखीरी कूळ; माखीराला गिलाद झाला; गिलादाचे गिलादी कूळ. गिलादाचे वंशज हे : इयेजेराचे इयेजेरी कूळ; हेलेकाचे हेलेकी कूळ; अस्रियेलाचे अस्रियेली कूळ; शेखेमाचे शेखेमी कूळ; शमीदा ह्याचे शमीदाई कूळ व हेफेराचे हेफेरी कूळ. हेफेराचा मुलगा सलाफहाद ह्याला मुलगे नव्हते; मुली मात्र होत्या; आणि सलाफहादाच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. ही मनश्शेची कुळे; ह्यांची गणती केली ती बावन्न हजार सातशे भरली. एफ्राइमाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूथेलाहाचे शूथेलाही कूळ, बेकेराचे बेकेरी कूळ; व तहनाचे तहनी कूळ; शूथेलाहाचे वंशज हे : एरानाचे एरानी कूळ; ही एफ्राइमाच्या वंशजांची कुळे; ह्यांची गणती केली ती बत्तीस हजार पाचशे भरली. आपापल्या कुळांप्रमाणे हे योसेफाचे वंशज होत. बन्यामिनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : बेला ह्याचे बेलाई कूळ, अशबेलाचे अशबेली कूळ; अहीरामाचे अहीरामी कूळ; शफूफामाचे शफूफामी कूळ; हूफामाचे हूफामी कूळ; बेला ह्याचे मुलगे अर्द व नामान हे होते. अर्दाचे अर्दी कूळ; नामानाचे नामानी कूळ. आपापल्या कुळांप्रमाणे हे बन्यामिनाचे वंशज होत. त्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार सहाशे भरली. दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूहामाचे शूहामी कूळ. ही दानाची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. सगळ्या शूहामी कुळांची गणती केली ती चौसष्ट हजार चारशे भरली. आशेराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : इम्ना ह्याचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ; बरीया ह्याचे बरीयाई कूळ. बरीयाच्या वंशजांतल्या हेबेराचे हेबेरी कूळ व मलकीएलाचे मलकीएली कूळ. आशेराच्या मुलीचे नाव सेराह होते. ही आशेराच्या मुलांची कुळे; ह्यांची गणती केली ती त्रेपन्न हजार चारशे भरली. नफतालीच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ; येसेराचे येसेरी कूळ व शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ. ही नफतालीची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. ह्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार चारशे भरली. इस्राएल लोकांची गणती झाली, ती सहा लक्ष एक हजार सातशे तीस भरली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्यांच्या लोकसंख्येप्रमाणे देशाचे वतन ह्यांच्यामध्ये द्यायचे आहे. अधिक संख्येच्या वंशांना अधिक वाटा द्यावा व कमी संख्येच्या वंशांना कमी वाटा द्यावा; प्रत्येक वंशाला त्याच्या-त्याच्या संख्येप्रमाणे वतन द्यावे; पण चिठ्ठ्या टाकून जमीन वाटण्यात यावी; त्यांच्या वाडवडिलांच्या वंशांच्या नावांप्रमाणे त्यांना वाटा मिळावा. ते संख्येने अधिक असोत किंवा कमी असोत, त्यांची वतने चिठ्ठ्या टाकून वाटण्यात यावीत. लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ. लेव्यांची कुळे : लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ व कोरही कूळ. कहाथाला अम्राम झाला. अम्रामाच्या स्त्रीचे नाव योखबेद होते; ती लेवीची मुलगी होती; ती त्याला मिसर देशात झाली होती. तिला अम्रामापासून अहरोन व मोशे आणि त्यांची बहीण मिर्याम ही झाली. अहरोनाला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले. नादाब व अबीहू ह्यांनी परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी नेला तेव्हा ते ठार झाले. लेव्यांपैकी एक महिन्याच्या व त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली, ते तेवीस हजार भरले; इस्राएल लोकांबरोबर त्यांची गणती केली नव्हती; कारण त्यांना इस्राएल लोकांबरोबर वतन दिले नव्हते. मोशे व एलाजार याजक ह्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी इस्राएल लोकांची गणती केली ती इतकी भरली. सीनाय रानात मोशे व अहरोन याजक ह्यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती तिच्यात ज्यांची गणती झाली होती त्यांच्यापैकी एकही पुरुष ह्या गणतीत नव्हता. कारण परमेश्वराने त्यांच्याविषयी सांगितले होते की ते रानातच मरतील. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता.