गणना 26
26
मवाब देशात इस्राएल लोकांची शिरगणती
1मरी येऊन गेल्यावर परमेश्वर मोशेला आणि अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला म्हणाला, 2“इस्राएलात जे वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असतील, त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्या सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीची गणती करा.”
3त्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजक हे यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना म्हणाले की, 4“मिसर देशातून मोशे व इस्राएल लोक आले होते तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणेच आताही वीस वर्षांच्या किंवा त्यांहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती करा.”
5इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन; रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : हनोख ह्याचे हनोखी कूळ; पल्लू ह्याचे पल्लूवी कूळ;
6हेस्रोन ह्याचे हेस्रोनी कूळ; कर्मी ह्यांचे कर्मी कूळ;
7ही रऊबेनी कुळे; त्यांची गणती केली ती त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.
8पल्लूचा मुलगा अलीयाब;
9अलीयाबचे मुलगे नमुवेल, दाथान व अबीराम. हे दाथान व अबीराम मंडळीतले निवडक पुरुष होते. कोरहाच्या टोळीने परमेश्वराला विरोध केला तेव्हा ह्यांनी त्या टोळीत सामील होऊन मोशे व अहरोन ह्यांना विरोध केला होता;
10ज्या वेळी ती अडीचशे पुरुषांची टोळी अग्नीत भस्म होऊन मरण पावली त्या वेळी पृथ्वीने आपले तोंड उघडून कोरहाबरोबर त्यांनाही गिळून टाकले, व ते चिन्हादाखल झाले.
11तरीपण कोरहाचे मुलगे मेले नव्हते.
12शिमोनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : नमुवेलाचे नमुवेली कूळ; यामीनाचे यामीनी कूळ;
13जेरहाचे जेरही कूळ; शौलाचे शौली कूळ;
14ही शिमोनी कुळे; ह्यांचे बावीस हजार दोनशे लोक भरले.
15गादाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : सफोनाचे सफोनी कूळ; हग्गीचे हग्गी कूळ; शूनीचे शूनी कूळ;
16आजनीचे आजनी कूळ; एरीचे एरी कूळ;
17अरोदाचे अरोदी कूळ; अरेलीचे अरेली कूळ;
18ही गादी कुळे; ह्यांची गणती केली ती चाळीस हजार पाचशे भरली.
19एर व ओनान हे यहूदाचे मुलगे होते. एर व ओनान कनान देशात मरण पावले.
20यहूदाच्या इतर मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शेला ह्याचे शेलानी कूळ; पेरेसाचे पेरेसी कूळ; जेरहाचे जेरही कूळ;
21पेरेसाच्या वंशजांची कुळे ही : हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ; हामूलाचे हामूली कूळ;
22ही यहूदाची कुळे; ह्यांची गणती केली ती शहात्तर हजार पाचशे भरली.
23इस्साखाराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : तोला ह्याचे तोलाई कूळ, पूवा ह्याचे पूवी कूळ;
24याशूबाचे याशूबी कूळ; शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.
25ही इस्साखाराची कुळे; ह्यांची गणती केली ती चौसष्ट हजार तीनशे भरली.
26जबुलूनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : सेरेदाचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ; याहलेलाचे याहलेली कूळ;
27ही जबुलूनाची कुळे; ह्यांची गणती केली ती साठ हजार पाचशे भरली.
28योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांच्यापासून जी कुळे निर्माण झाली ती ही :
29मनश्शेचे वंशज हे : माखीराचे माखीरी कूळ; माखीराला गिलाद झाला; गिलादाचे गिलादी कूळ.
30गिलादाचे वंशज हे : इयेजेराचे इयेजेरी कूळ; हेलेकाचे हेलेकी कूळ;
31अस्रियेलाचे अस्रियेली कूळ; शेखेमाचे शेखेमी कूळ;
32शमीदा ह्याचे शमीदाई कूळ व हेफेराचे हेफेरी कूळ.
33हेफेराचा मुलगा सलाफहाद ह्याला मुलगे नव्हते; मुली मात्र होत्या; आणि सलाफहादाच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
34ही मनश्शेची कुळे; ह्यांची गणती केली ती बावन्न हजार सातशे भरली.
35एफ्राइमाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूथेलाहाचे शूथेलाही कूळ, बेकेराचे बेकेरी कूळ; व तहनाचे तहनी कूळ;
36शूथेलाहाचे वंशज हे : एरानाचे एरानी कूळ;
37ही एफ्राइमाच्या वंशजांची कुळे; ह्यांची गणती केली ती बत्तीस हजार पाचशे भरली. आपापल्या कुळांप्रमाणे हे योसेफाचे वंशज होत.
38बन्यामिनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : बेला ह्याचे बेलाई कूळ, अशबेलाचे अशबेली कूळ; अहीरामाचे अहीरामी कूळ;
39शफूफामाचे शफूफामी कूळ; हूफामाचे हूफामी कूळ;
40बेला ह्याचे मुलगे अर्द व नामान हे होते. अर्दाचे अर्दी कूळ; नामानाचे नामानी कूळ.
41आपापल्या कुळांप्रमाणे हे बन्यामिनाचे वंशज होत. त्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार सहाशे भरली.
42दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूहामाचे शूहामी कूळ. ही दानाची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत.
43सगळ्या शूहामी कुळांची गणती केली ती चौसष्ट हजार चारशे भरली.
44आशेराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : इम्ना ह्याचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ; बरीया ह्याचे बरीयाई कूळ.
45बरीयाच्या वंशजांतल्या हेबेराचे हेबेरी कूळ व मलकीएलाचे मलकीएली कूळ.
46आशेराच्या मुलीचे नाव सेराह होते.
47ही आशेराच्या मुलांची कुळे; ह्यांची गणती केली ती त्रेपन्न हजार चारशे भरली.
48नफतालीच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ;
49येसेराचे येसेरी कूळ व शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.
50ही नफतालीची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. ह्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार चारशे भरली.
51इस्राएल लोकांची गणती झाली, ती सहा लक्ष एक हजार सातशे तीस भरली.
चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी
52परमेश्वर मोशेला म्हणाला,
53“ह्यांच्या लोकसंख्येप्रमाणे देशाचे वतन ह्यांच्यामध्ये द्यायचे आहे.
54अधिक संख्येच्या वंशांना अधिक वाटा द्यावा व कमी संख्येच्या वंशांना कमी वाटा द्यावा; प्रत्येक वंशाला त्याच्या-त्याच्या संख्येप्रमाणे वतन द्यावे;
55पण चिठ्ठ्या टाकून जमीन वाटण्यात यावी; त्यांच्या वाडवडिलांच्या वंशांच्या नावांप्रमाणे त्यांना वाटा मिळावा.
56ते संख्येने अधिक असोत किंवा कमी असोत, त्यांची वतने चिठ्ठ्या टाकून वाटण्यात यावीत.
लेव्यांची कुळे
57लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ.
58लेव्यांची कुळे : लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ व कोरही कूळ. कहाथाला अम्राम झाला.
59अम्रामाच्या स्त्रीचे नाव योखबेद होते; ती लेवीची मुलगी होती; ती त्याला मिसर देशात झाली होती. तिला अम्रामापासून अहरोन व मोशे आणि त्यांची बहीण मिर्याम ही झाली.
60अहरोनाला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.
61नादाब व अबीहू ह्यांनी परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी नेला तेव्हा ते ठार झाले.
62लेव्यांपैकी एक महिन्याच्या व त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली, ते तेवीस हजार भरले; इस्राएल लोकांबरोबर त्यांची गणती केली नव्हती; कारण त्यांना इस्राएल लोकांबरोबर वतन दिले नव्हते.
पहिल्या शिरगणतीतले कालेब व यहोशवा मात्र हयात
63मोशे व एलाजार याजक ह्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी इस्राएल लोकांची गणती केली ती इतकी भरली.
64सीनाय रानात मोशे व अहरोन याजक ह्यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती तिच्यात ज्यांची गणती झाली होती त्यांच्यापैकी एकही पुरुष ह्या गणतीत नव्हता.
65कारण परमेश्वराने त्यांच्याविषयी सांगितले होते की ते रानातच मरतील. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता.
सध्या निवडलेले:
गणना 26: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.