जबुलूनाच्या कुळातील कुळेः
सेरेदचे सेरेदी कूळ,
एलोनाचे एलोनी कूळ,
याहलेलचे याहलेली कूळ. जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.
योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली. मनश्शेच्या कुळातील कुळेः
माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता),
गिलादाचे गिलादी कूळ.
गिलादाची कूळे होतीः
इयेजेराचे इयेजेरी कूळ,
हेलेकाचे हेलेकी कूळ.
अस्रियेलाचे अस्रियेली कूळ,
शेखेमाचे शेखेमी कूळ.
शमीदचे शमीदाई कूळ,
हेफेराचे हेफेरी कूळ.
हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.
एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ. एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी. ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.
बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः
बेलाचे बेलाई कूळ,
आशबेलाचे आशबेली कूळ,
अहीरामाचे अहीरामी कूळ.
शफूफामाचे शफूफामी कूळ,
हुफामाचे हुफामी कूळ.
बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ. ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.
दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते. शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.
आशेराच्या कुळातील कुळे होतीः
इम्नाचे इम्नाई कूळ,
इश्वीचे इश्वी कूळ,
बरीयाचे बरीयाई कूळ.
बरीयाच्या कुळातील कुळे होतीः
हेबेराचे हेबेरी कूळ,
मलकीएलाचे मलकीएली कूळ.
आशेरला सेरा नावाची मुलगी होती. ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.
नफतालीच्या कुळातील कुळे होतीः
यहसेलाचे यहसेली कूळ,
गूनीचे गूनी कूळ. येसेराचे येसेरी कूळ,
शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.
ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.
ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.
मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल. देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा. प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील.
त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः
गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ,
कहाथाचे कहाथी कूळ,
मरारीचे मरारी कूळ.
लेव्याची ही कूळे होतीः
लिब्नी कूळ,
हेब्रोनी कूळ,
महली कूळ,
मूशी कूळ,
आणि कोरही कूळ.
अम्राम कहाथाच्या कुळातील होता. अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते. पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले. लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही.
मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली. खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.