YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 20:11-13

गणना 20:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली. पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही. त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.

सामायिक करा
गणना 20 वाचा

गणना 20:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले, आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना म्हटले, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.” त्या झर्‍याचे नाव मरीबा (म्हणजे भांडण) पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले, आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले.

सामायिक करा
गणना 20 वाचा