YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 14:11-25

गणना 14:11-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत? मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन.” मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस. आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील. ह्यांनी ऐकले आहे की, तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस; तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असतोस. आता तू ह्या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ती म्हणतील, ‘जो देश परमेश्वराने ह्या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना न्यायला तो असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारून टाकले.’ म्हणून मी विनवतो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याची महती दिसू दे; तू म्हटलेच आहेस की, ‘परमेश्वर मंदक्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे; तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.’ तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येथपर्यंत जशी तू ह्या लोकांना क्षमा केलीस तशी ह्या वेळीही त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवतो.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे; आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही; म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत. तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे, म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा.”

सामायिक करा
गणना 14 वाचा

गणना 14:11-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? ह्यांच्यामध्ये मी केलेली शक्तीशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यास चुकत आहेत. मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.” मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकांस बाहेर आणले. ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्यापुढे चालतोस. आता जर तू या लोकांस एका मनुष्याप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील, परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले. “म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास, परमेश्वर रागवायला मंद आहे आणि विपुल दयेने भरलेला आहे. तो अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांची मुळीच गय करत नाही. तो पूर्वजांच्या पापाबद्दल त्यांच्या वंशजाच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर वडिलांच्या अन्यायाची शिक्षा लेकरांना करतो. मी तुला विनंती करतो, तुझ्या महान विश्वसनीयतेच्या कराराने त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही त्यांना क्षमा कर.” परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.” पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे. ज्या सर्व लोकांनी माझे वैभव आणि मिसर देशात व रानात सामर्थ्याची चिन्हे पाहिले. तरी दहादा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी वाणी ऐकली नाही. मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो ते खचित पाहणार नाहीत. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही. पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्यास नेईल. आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल. अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात राहत आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा.

सामायिक करा
गणना 14 वाचा

गणना 14:11-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह मोशेला म्हणाले, “हे लोक कुठवर माझा तिरस्कार करणार? त्यांच्यामध्ये मी केलेले सर्व चमत्कार पाहूनही कुठवर माझ्यावर विश्वास ठेवण्यास ते नकार देतील? मी त्यांच्यावर पीडा आणून त्यांचा नाश करेन, परंतु मी तुझ्यापासून त्यांच्याहून मोठे व बलवान राष्ट्र करेन.” मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे. आणि ते त्या देशात राहणार्‍यांना याविषयी सांगतील. त्यांनी तर आधी तुमच्याविषयी ऐकले आहे की, तुम्ही याहवेह या लोकांबरोबर आहात, तुमचा मेघस्तंभ त्यांच्यावर असतो आणि याहवेह तुम्ही त्यांना समोरासमोर दिसता आणि तुम्ही दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात त्यांच्यापुढे असता. जर तुम्ही या लोकांपैकी कोणालाही जिवंत न ठेवता मारून टाकले, तर ज्या राष्ट्रांनी तुमच्याविषयी ऐकले आहे ते म्हणतील, ‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’ “आता प्रभूचे सामर्थ्य तुम्ही घोषित केल्याप्रमाणेच प्रकट होवो: ‘याहवेह मंदक्रोध, अत्यंत प्रीती करणारे, अन्याय व पापाची क्षमा करणारे आहेत. तरीही ते दोषीला निर्दोष सोडत नाहीत; तर तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततींना देतात.’ आपल्या महान प्रीतीनुसार, जसे इजिप्त सोडले तेव्हापासून आतापर्यंत क्षमा केली, तसेच आताही त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करावी.” मग याहवेहने उत्तर दिले, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. परंतु खचितच मी जिवंत आहे आणि खचितच संपूर्ण पृथ्वी याहवेहच्या वैभवाने भरलेली आहे. ज्यांनी माझे वैभव आणि मी इजिप्तमध्ये व रानात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझा आज्ञाभंग केला व दहा वेळा माझी परीक्षा पाहिली; त्यांच्यातील एकही व्यक्ती, जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो पाहणार नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखले आहे त्यातील कोणीही तो देश पाहणार नाही. परंतु माझा सेवक कालेब याच्यावर वेगळा आत्मा आहे आणि तो संपूर्ण हृदयाने माझे अनुसरण करतो, म्हणून तो ज्या देशात गेला होता तिथे मी त्याला नेईन व त्याचे वंशज त्या देशाचे वतन पावतील. अमालेकी व कनानी लोक खोर्‍यामध्ये राहतात म्हणून, उद्या तुम्ही माघारी फिरा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने जा.”