YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 14:11-25

गणना 14:11-25 MRCV

याहवेह मोशेला म्हणाले, “हे लोक कुठवर माझा तिरस्कार करणार? त्यांच्यामध्ये मी केलेले सर्व चमत्कार पाहूनही कुठवर माझ्यावर विश्वास ठेवण्यास ते नकार देतील? मी त्यांच्यावर पीडा आणून त्यांचा नाश करेन, परंतु मी तुझ्यापासून त्यांच्याहून मोठे व बलवान राष्ट्र करेन.” मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे. आणि ते त्या देशात राहणार्‍यांना याविषयी सांगतील. त्यांनी तर आधी तुमच्याविषयी ऐकले आहे की, तुम्ही याहवेह या लोकांबरोबर आहात, तुमचा मेघस्तंभ त्यांच्यावर असतो आणि याहवेह तुम्ही त्यांना समोरासमोर दिसता आणि तुम्ही दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात त्यांच्यापुढे असता. जर तुम्ही या लोकांपैकी कोणालाही जिवंत न ठेवता मारून टाकले, तर ज्या राष्ट्रांनी तुमच्याविषयी ऐकले आहे ते म्हणतील, ‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’ “आता प्रभूचे सामर्थ्य तुम्ही घोषित केल्याप्रमाणेच प्रकट होवो: ‘याहवेह मंदक्रोध, अत्यंत प्रीती करणारे, अन्याय व पापाची क्षमा करणारे आहेत. तरीही ते दोषीला निर्दोष सोडत नाहीत; तर तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततींना देतात.’ आपल्या महान प्रीतीनुसार, जसे इजिप्त सोडले तेव्हापासून आतापर्यंत क्षमा केली, तसेच आताही त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करावी.” मग याहवेहने उत्तर दिले, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. परंतु खचितच मी जिवंत आहे आणि खचितच संपूर्ण पृथ्वी याहवेहच्या वैभवाने भरलेली आहे. ज्यांनी माझे वैभव आणि मी इजिप्तमध्ये व रानात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझा आज्ञाभंग केला व दहा वेळा माझी परीक्षा पाहिली; त्यांच्यातील एकही व्यक्ती, जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो पाहणार नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखले आहे त्यातील कोणीही तो देश पाहणार नाही. परंतु माझा सेवक कालेब याच्यावर वेगळा आत्मा आहे आणि तो संपूर्ण हृदयाने माझे अनुसरण करतो, म्हणून तो ज्या देशात गेला होता तिथे मी त्याला नेईन व त्याचे वंशज त्या देशाचे वतन पावतील. अमालेकी व कनानी लोक खोर्‍यामध्ये राहतात म्हणून, उद्या तुम्ही माघारी फिरा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने जा.”

गणना 14 वाचा