YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12:18-27

मार्क 12:18-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणारे सदूकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले, “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘कोणाएकाचा भाऊ मेला, आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ कोणी सात भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला. मग ती दुसर्‍याने केली; तोही संतती न होता मेला; आणि तशीच तिसर्‍याचीही गोष्ट झाली. ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली. तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना? कारण मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत; तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे?’ तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:18-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर, जे पुनरुत्थान नाही असे मानणारे काही सदूकी त्याच्याकडे आले त्यांनी त्यास विचारले, “गुरुजी. मोशेने आमच्यासाठी पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मरण पावला व त्याची पत्नी मागे राहिली, परंतु त्यांना मूलबाळ नसले तर आपल्या भावाच्या वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मरण पावलेल्या भावाचा वंश वाढवावा. तर असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ न होता मरण पावला. दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोसुध्दा मूलबाळ न होता मरण पावला. तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मरण पावली. सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.” येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात. कारण जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत, त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील. परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. तो मरण पावलेल्यांचा देव नव्हे तर जिवंत लोकांचा देव आहे. तुम्ही फार चुकत आहात.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:18-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले. त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आपल्यासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला. मग दुसर्‍या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्‍याचेही तसेच झाले. ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली. आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता? जेव्हा मृत लोक उठतील, ते विवाह करत नाही किंवा विवाह करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे?’ ते मृतांचे नसून जिवंतांचे परमेश्वर आहेत, तुम्ही फार मोठी चूक करत आहात.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:18-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणारे सदूकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले, “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘कोणाएकाचा भाऊ मेला, आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ कोणी सात भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला. मग ती दुसर्‍याने केली; तोही संतती न होता मेला; आणि तशीच तिसर्‍याचीही गोष्ट झाली. ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली. तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना? कारण मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत; तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे?’ तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:18-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पुनरुत्थान नाही, असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले व त्याला विचारू लागले, “गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी अशी आज्ञा लिहून ठेवली आहे की, कोणा एकाचा भाऊ निधन पावला आणि त्याची पत्नी मागे राहिली व त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने तिच्याबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. कोणी सात भाऊ होते. त्यांच्यापैकी पहिल्या भावाने पत्नी केली व तो संतती न होता निधन पावला. मग त्याची पत्नी दुसऱ्या भावाने केली. तोही संतती न होता निधन पावला. तशीच तिसऱ्याचीही गत झाली. ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता निधन पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली. तर मग पुनरुत्थानसमयी ते सर्व उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. तरी पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात, ह्या मुद्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे’? तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा