मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले. त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आपल्यासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला. मग दुसर्या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्याचेही तसेच झाले. ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली. आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता? जेव्हा मृत लोक उठतील, ते विवाह करत नाही किंवा विवाह करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे?’ ते मृतांचे नसून जिवंतांचे परमेश्वर आहेत, तुम्ही फार मोठी चूक करत आहात.”
मार्क 12 वाचा
ऐका मार्क 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 12:18-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ