मार्क 12:14
मार्क 12:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी की, आपण प्रामाणिक आहात आणि पक्षपात न करता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता हे आम्हास माहीत आहे तर मग कैसरला कर देणे योग्य आहे की नाही? आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा?”
मार्क 12:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते त्याच्याकडे आले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता, भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाही व खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता; तर आम्हाला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?
मार्क 12:14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आपण खरे आहात व कोणाची भीडमुरवत धरत नाही, कारण आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्त्विक भावाने शिकवत असता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसराला कर देणे रास्त आहे की नाही? आम्ही तो द्यावा की न द्यावा?”
मार्क 12:14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आपण खरे असून कोणाची भीड बाळगत नाही. आपण व्यक्तीनुसार नव्हे तर सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही? आम्ही तो भरावा की भरू नये?”