YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 1:21-28

मार्क 1:21-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.” परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.” लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!” येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:21-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ते कफर्णहूम या शहरात आले, शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये जाऊन येशूंनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवणकीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते. इतक्यात, सभागृहामध्ये दुरात्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला, “हे नासरेथकर येशू, आम्हाकडून तुला काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!” “गप्प राहा!” येशूंनी धमकावले, “यातून बाहेर ये!” त्या दुरात्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते दुरात्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.” त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:21-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर ते कफर्णहूमास गेले; आणि लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता; तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!” येशूने त्याला धमकावून म्हटले, “उगाच राहा व ह्याच्यातून नीघ.” तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.” ही त्याची कीर्ती लगेच गालीलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:21-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले. त्याच्या प्रबोधनावरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत असे. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात एक भूतग्रस्त मनुष्य आला आणि ओरडून म्हणाला, “हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस.” येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.” भुताने त्या माणसाला पिळून काढले व आक्रोश करीत ते त्याच्यातून निघून गेले. सर्व लोक इतके थक्क झाले की, ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? ही काय नवीन शिकवण आहे? हा भुतांनाही अधिकाराने आज्ञा करतो व ती त्याचे ऐकतात.” ही त्याची कीर्ती गालीलच्या परिसरात सर्वत्र वेगाने पसरली.

सामायिक करा
मार्क 1 वाचा