ते कफर्णहूम या शहरात आले, शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये जाऊन येशूंनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवणकीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते. इतक्यात, सभागृहामध्ये दुरात्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला, “हे नासरेथकर येशू, आम्हाकडून तुला काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!” “गप्प राहा!” येशूंनी धमकावले, “यातून बाहेर ये!” त्या दुरात्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते दुरात्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.” त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली.
मार्क 1 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 1:21-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ