मत्तय 15:1-11
मत्तय 15:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग यरुशलेमेहून परूशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवणापूर्वी ते हात धूत नाहीत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीही आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की, तू ‘आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर’, आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता की, ‘जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये.’ अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की, ‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम.”’ तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या : जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.”
मत्तय 15:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा यरूशलेम शहराहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, “तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.” येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे.’ पण तुम्ही म्हणता, ‘जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे.’ ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो: हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.” तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या. जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.”
मत्तय 15:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परूशी आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंकडे येऊन विचारू लागले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरा का मोडतात? जेवणापूर्वी ते आपले हात धूत नाहीत!” येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता? परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा’ आणि ‘जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.’ परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे. अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता. अहो ढोंग्यांनो! यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे, तो म्हणतो: “ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ” येशूने गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “ऐका आणि समजून घ्या. मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अशुद्ध करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अशुद्ध करते.”
मत्तय 15:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग यरुशलेमेहून परूशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवणापूर्वी ते हात धूत नाहीत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीही आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की, तू ‘आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर’, आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता की, ‘जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये.’ अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की, ‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम.”’ तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या : जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.”
मत्तय 15:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
यरुशलेमहून काही परुशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “तुमचे शिष्य वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे का चालत नाहीत? ते हात न धुता जेवतात.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही स्वतःची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा का मोडता? देवाने असे म्हटले आहे, “तू तुझे वडील व तुझी आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता, जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, “मी तुम्हांला जे काही द्यायला हवे होते, ते मी देवाला अर्पण केले आहे’, अशा माणसाने आपल्या वडिलांचा अथवा आईचा सन्मान केला नाही तरी चालेल. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. धर्मशास्त्र म्हणून ते माझी व्यर्थ उपासना करतात कारण ते मनुष्यांचे नियम शिकवतात.” नंतर येशूने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या. जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.”