तेव्हा यरूशलेम शहराहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, “तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.” येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे.’ पण तुम्ही म्हणता, ‘जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे.’ ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो: हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.” तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या. जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.”
मत्त. 15 वाचा
ऐका मत्त. 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्त. 15:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ