लूक 5:33-39
लूक 5:33-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात. येशू त्यांना म्हणाला, “कोण असे करेल? वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय? पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसात ते उपवास करतील.” त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही. आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या द्राक्षरसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल. नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे. कोणालाही जुना द्राक्षरस प्याल्यानंतर त्यांना नवा नको असतो कारण तो म्हणतो, जुना द्राक्षरसच चांगला आहे.”
लूक 5:33-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात; तसे परूश्यांचेही शिष्य करतात; आपले शिष्य तर खातात पितात.” येशूने त्यांना म्हटले, “वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपास करायला लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; त्या दिवसांत ते उपास करतील.” आणखी त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला : “कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल; आणि नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालत नाही; घातला तर नवा द्राक्षारस बुधले फाडून गळून जाईल व बुधल्यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.] जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.”

लूक 5:33-39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते येशूंना म्हणाले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, परंतु तुमचे शिष्य मात्र खातात व पितात.” यावर येशूंनी त्यांना विचारले, “वराचे मित्र त्यांच्याबरोबर वर असताना उपवास कसे करतील? तरी अशी वेळ येत आहे, की त्यावेळी वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.” नंतर येशूंनी त्यांना एक दाखला सांगितला: ते म्हणाले, “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल. कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात. जुना द्राक्षारस प्याल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस घ्यावासा वाटत नाही. ते म्हणतात, ‘जुना द्राक्षारसच उत्तम आहे.’ ”
लूक 5:33-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात; तसे परूश्यांचेही शिष्य करतात; आपले शिष्य तर खातात पितात.” येशूने त्यांना म्हटले, “वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपास करायला लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; त्या दिवसांत ते उपास करतील.” आणखी त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला : “कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल; आणि नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालत नाही; घातला तर नवा द्राक्षारस बुधले फाडून गळून जाईल व बुधल्यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.] जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.”
लूक 5:33-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर त्यांनी त्याला म्हटले, “योहानचे शिष्य वारंवार उपवास व प्रार्थना करतात, तसेच परुश्यांचेही शिष्य करतात परंतु आपले शिष्य खातपीत असतात.” येशूने त्यांना म्हटले, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे, तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय? असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, त्या दिवसांत ते उपवास करतील.” येशूने त्यांना एक दाखलाही सांगितला:“कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावीत नाही. तसे केले तर नवीन फाडले जाते व नव्याचे ठिगळ जुन्याशी विसंगत दिसते. तसेच नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षारस बुधले फोडील, द्राक्षारस सांडेल व बुधल्यांचा नाश होईल. उलट, नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालणे आवश्यक असते. तसेच जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही कारण जुना चांगला आहे, असे तो म्हणतो.”