ते येशूंना म्हणाले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, परंतु तुमचे शिष्य मात्र खातात व पितात.” यावर येशूंनी त्यांना विचारले, “वराचे मित्र त्यांच्याबरोबर वर असताना उपवास कसे करतील? तरी अशी वेळ येत आहे, की त्यावेळी वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.” नंतर येशूंनी त्यांना एक दाखला सांगितला: ते म्हणाले, “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल. कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात. जुना द्राक्षारस प्याल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस घ्यावासा वाटत नाही. ते म्हणतात, ‘जुना द्राक्षारसच उत्तम आहे.’ ”
लूक 5 वाचा
ऐका लूक 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 5:33-39
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ