YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 5:33-39

लूक 5:33-39 IRVMAR

ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात. येशू त्यांना म्हणाला, “कोण असे करेल? वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय? पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसात ते उपवास करतील.” त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही. आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या द्राक्षरसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल. नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे. कोणालाही जुना द्राक्षरस प्याल्यानंतर त्यांना नवा नको असतो कारण तो म्हणतो, जुना द्राक्षरसच चांगला आहे.”

लूक 5 वाचा

ऐका लूक 5

संबंधित व्हिडिओ