YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 23:15-32

लेवीय 23:15-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शब्बाथानंतरच्या दुसर्‍या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुरे सात शब्बाथ मोजावेत; सातव्या शब्बाथाच्या दुसर्‍या दिवसापर्यंत पन्नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ नवे अन्नार्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून दोन दशमांश एफाभर सपिठाच्या दोन भाकरी ओवाळणीसाठी आणाव्यात. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात; परमेश्वराप्रीत्यर्थ हे प्रथमउपजाचे अर्पण होय. वर्षावर्षाची सात दोषहीन कोकरे, एक गोर्‍हा आणि दोन मेंढे भाकरीबरोबर अर्पावेत; त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्यांच्यासह परमेश्वराप्रीत्यर्थ त्यांचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. मग पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी एकेक वर्षाचे दोन मेंढे अर्पावेत. याजकाने ती अर्पणे प्रथमउपजाच्या भाकरी-बरोबर त्या दोन मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावीत; ही परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असून याजकाच्या वाट्याची व्हावीत. तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की, आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे म्हणून कोणीही अंगमेहनतीचे काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कोनाकोपर्‍यातील सार्‍या पिकाची कापणी करू नका, आणि सरवा वेचू नका; गरीब व उपरे ह्यांच्यासाठी तो राहू द्या; मी परमेश्वर तुमचा देव आहे.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही अंगमेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे.” परमेश्वराने मोशेला सांगितले, “त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्‍चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्‍चित्ताचा दिवस होय; त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल. त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जिवाला दंडन करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. कोणाही मनुष्याने त्या दिवशी कसलेही काम केले तर मी त्याला स्वजनांतून नाहीसा करीन. तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तो दिवस तुम्हांला परमविश्रामाचा शब्बाथ व्हावा व तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसर्‍या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्बाथ पाळावा.”

सामायिक करा
लेवीय 23 वाचा

लेवीय 23:15-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे; सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे. त्यादिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय. एक गोऱ्हा, दोन मेंढे व प्रत्येकी एक वर्षाची सात नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वरास संतोष होईल. आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी प्रत्येकी एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पावित. याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी. त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हास पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय. तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचू नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!” आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी; तुम्ही कोणतेही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वरास अर्पण अर्पावे.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पण अर्पावे. त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल. त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्यादिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन. तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय. तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”

सामायिक करा
लेवीय 23 वाचा

लेवीय 23:15-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“ ‘शब्बाथाच्या दुसर्‍या दिवशी, तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुढे पूर्ण सात आठवडे मोजावे. पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे. तुम्ही कुठेही राहत असाल तरी अर्पण म्हणून दोन भाकरी आणाव्यात. एका एफाच्या दहा भागातील दोन भाग सपिठाच्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात, पहिल्या उत्पन्नातून ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी असे अर्पण आणावे. या भाकरीबरोबर तुम्ही एक वर्षाची सात निर्दोष नरकोकरे, एक गोर्‍हा व दोन मेंढे अर्पावे, ते पेयार्पण व अन्नार्पणासह याहवेहला एक होमार्पण असतील, याहवेहला प्रसन्न करणारा एक सुगंध होमार्पण. मग याजकाने पापार्पणासाठी एक बोकड व शांत्यर्पणासाठी एक वर्षांचे दोन मेंढे अर्पण करावे. याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल. त्याच दिवशी तुम्ही एक पवित्र सभा भरवा आणि नियमित कामे करू नका. तुम्ही कुठेही राहिले तरी तुमच्या सर्व भावी पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. “ ‘तुम्ही आपल्या जमिनीतील पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्‍यातील पिकांची कापणी करू नये किंवा खाली पडलेले धान्य गोळा करू नये. हे गरिबांसाठी व तुम्हामध्ये राहणार्‍या परदेशीयांसाठी ते तसेच राहू द्यावे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकास सांग: ‘सातव्या महिन्याचा पहिला दिवस तुम्ही शब्बाथ विश्रांतीसाठी ठेवावा, या दिवशी पवित्र मेळावा करून स्मृतिदिन म्हणून कर्णे फुंकावेत. या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ” नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे. या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल. जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल. जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन. कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. तो दिवस तुमच्यासाठी शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे. महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढील संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचा शब्बाथ पाळावा.”