“ ‘शब्बाथाच्या दुसर्या दिवशी, तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुढे पूर्ण सात आठवडे मोजावे. पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे. तुम्ही कुठेही राहत असाल तरी अर्पण म्हणून दोन भाकरी आणाव्यात. एका एफाच्या दहा भागातील दोन भाग सपिठाच्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात, पहिल्या उत्पन्नातून ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी असे अर्पण आणावे. या भाकरीबरोबर तुम्ही एक वर्षाची सात निर्दोष नरकोकरे, एक गोर्हा व दोन मेंढे अर्पावे, ते पेयार्पण व अन्नार्पणासह याहवेहला एक होमार्पण असतील, याहवेहला प्रसन्न करणारा एक सुगंध होमार्पण. मग याजकाने पापार्पणासाठी एक बोकड व शांत्यर्पणासाठी एक वर्षांचे दोन मेंढे अर्पण करावे. याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल. त्याच दिवशी तुम्ही एक पवित्र सभा भरवा आणि नियमित कामे करू नका. तुम्ही कुठेही राहिले तरी तुमच्या सर्व भावी पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. “ ‘तुम्ही आपल्या जमिनीतील पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्यातील पिकांची कापणी करू नये किंवा खाली पडलेले धान्य गोळा करू नये. हे गरिबांसाठी व तुम्हामध्ये राहणार्या परदेशीयांसाठी ते तसेच राहू द्यावे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकास सांग: ‘सातव्या महिन्याचा पहिला दिवस तुम्ही शब्बाथ विश्रांतीसाठी ठेवावा, या दिवशी पवित्र मेळावा करून स्मृतिदिन म्हणून कर्णे फुंकावेत. या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ” नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे. या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल. जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल. जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन. कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. तो दिवस तुमच्यासाठी शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे. महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढील संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचा शब्बाथ पाळावा.”
लेवीय 23 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 23:15-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ