YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 16:29-34

लेवीय 16:29-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशी असो; हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल. तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बाथ आहे; तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करु नये; हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे. तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे. त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.” इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.

सामायिक करा
लेवीय 16 वाचा

लेवीय 16:29-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल. तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय. अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत त्याने परमपवित्रस्थान, सभामंडप, वेदी, याजकवर्ग व इस्राएली लोक यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे. “तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.

सामायिक करा
लेवीय 16 वाचा

लेवीय 16:29-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुमच्यासाठी हा निरंतरचा विधी असावा : सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो; कारण त्या दिवशी तुम्हांला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल; परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल. तुमच्यासाठी हा परमविश्रामाचा शब्बाथ होय; ह्या दिवशी तुम्ही आपल्या जिवांस दंडन करावे; हा निरंतरचा विधी होय. आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्‍चित्त करावे. त्याने पवित्रस्थानासाठी प्रायश्‍चित्त करावे; दर्शनमंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे. इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्‍चित्त करण्यात यावे, म्हणून हा तुम्हांला निरंतरचा विधी होय.”परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले.

सामायिक करा
लेवीय 16 वाचा