तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल. तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय. अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत त्याने परमपवित्रस्थान, सभामंडप, वेदी, याजकवर्ग व इस्राएली लोक यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे. “तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.
लेवीय 16 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 16:29-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ